लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर कंपनीला जोरदार दणका बसला आहे. या प्रकरणातील तांत्रिक पुरावे तपासण्याकरिता फॉरेन्सिक फायनान्शियल ऑडिटरची नियुक्ती करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. त्यासाठी सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.यासंदर्भात लक्ष्मीनगर येथील रहिवासी विवेक पाठक यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक़ व पुष्पा गणेडीवाला यांनी हा आदेश देऊन ती याचिका निकाली काढली. पाठक यांनी वासनकर कंपनीत एक कोटी रुपये गुंतवले होते. ती रक्कम आरोपींनी गिळंकृत केली. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे पोलीस निरीक्षकांनी १ ऑगस्ट २०१५ रोजी राज्य सरकारला पत्र लिहून प्रकरणातील तांत्रिक पुरावे तपासण्याकरिता फॉरेन्सिक फायनान्सियल ऑडिटरची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याचा लाभ आरोपींना मिळण्याची शक्यता होती. परिणामी, पाठक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष सत्र न्यायालयामध्ये वासनकर खटल्यावर सुनावणी सुरू झाली आहे. १४ ऑक्टोबर २०१४ रोजी आर्थिक गुन्हे विभागाने वासनकर कंपनीचे लॅपटॉप, हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह इत्यादी साहित्य मुंबईतील फॉरेन्सिक लेबॉरेटरीला पाठवले होते. त्याचा अहवाल आरोपींचे गुन्हे सिद्ध करणारा आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. रजनीश व्यास तर, सरकारतर्फे अॅड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.आरोपींनी अशी केली फसवणूकवासनकर कंपनीने ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने व ४८ महिने मुदतीच्या वेगवगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर मुदत संपूनही ठेवी व त्यावरील परतावा अदा करण्यात आला नाही. परिणामी, गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर झालेल्या तपासामध्ये आरोपींचे पितळ उघडे पडले. आरोपी गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करून गुंतवणूकदारांना जाळ्यात फसवित होते. कंपनीने नेमलेले एजेन्टस् राज्यभर फिरून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते. प्रकरणातील आरोपींमध्ये वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर, प्रशांतची आई सरला, पत्नी भाग्यश्री, भाऊ विनय, साळा अभिजित चौधरी, सासू कुमुद चौधरी, विनयची पत्नी मिथिला, सीए पराग हांगेकर, कर्मचारी सुजित मजुमदार यांच्यासह एकूण २५ जणांचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या नागपूरच्या वासनकर कंपनीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 7:59 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर कंपनीला जोरदार दणका बसला आहे. या प्रकरणातील ...
ठळक मुद्देहायकोर्ट : फॉरेन्सिक फायनान्शियल ऑडिटर नियुक्तीचा आदेश