शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

वासनकरच्या फसवणुकीची चौकशी ईडीतर्फे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:46 AM

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.निवेदनात म्हटले आहे की, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.चे प्रशांत जयदेव वासनकर आणि एजंटांनी २०१४ मध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत कोणतीही चौकशी वा संपत्ती जप्त केलेली नाही. केवळ गुन्हेगाराला बाहेर सोडण्यासाठी मदत केली. हे प्रकरण न्यायालयात असून त्यावर कुठलाही ठोस निर्णय होत नसल्यामुळे हे प्रकरण ईडीकडे सोपविल्यास पैसे परत मिळण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.प्रशांत वासनकरने गुंतवणूकदारांच्या एका बैठकीत आॅगस्ट २०१४ मध्ये पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने स्वत:ला अटक करून घेतली. चौकशीदरम्यान प्रत्येकवेळी आर्थिक गुन्हे शाखेतून उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे. या प्रकरणी एमपीआयडी कोर्टात सुनावणी सुरू होती. पण न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आर्थिक गुन्हे शाखेला धारेवर धरून आरोपींना अटक करण्यास सांगितले होते. आरोपींना अटक करण्याचा आदेश जाहीर झाला आणि काही दिवसांत सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. त्यानंतर न्यायाधीश आझमी व आता न्यायाधीश शेखर मुनघाटे या प्रकरणी सुनावणी करीत आहेत. पण त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला विचारणा केलेली नाही.वासनकर समूह आणि एजंटांविरोधात जवळपास ९०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी ३५० कोटींची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा असूनही गुन्हे शाखेकडून कुठलीही चौकशी न करता प्रकरण बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे ईडीतर्फे चौकशी केल्यास गुुंतवणूकदारांना न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी सुधीर दुरगकर, मंदा लांजेवार, शामकांत सुकळीकर, विवेक करमरकर, विलास मंगळुरकर, यास्मीन इमाम, रबींद्र रॉय, अशोक खोरगडे, विजय नाईक, अशोक पशीने, एस.एम. तामडू, अनुप पशीने, दीपाली बनसोड, राजेश गोमकाळे, नितीन देशमुख, संजय गावंडे, प्रकाश वासनिक, दिलीप काळबांडे, सुनील आमसोडे, पूजा काळबांडे, कपले, के.जी. नाईक आदी गुंतवणूकदार उपस्थित होते.

 

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजी