शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
3
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
4
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
5
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
6
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
7
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
8
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
9
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
10
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
11
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
12
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
13
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
14
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
15
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
16
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
17
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
18
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
19
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
20
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

मांस प्रक्रिया उद्योगांवर ‘वॉच’

By admin | Published: January 06, 2015 1:00 AM

कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले जाते किंवा नाही याची खात्री करण्यासाठी शेगाव तालुक्यातील (बुलडाणा) तरोडास्थित शाहीन फ्रोजन फूड्स व बेस्ट कोल्ड स्टोरेज

हरित लवाद : सुकृत निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या अर्जावर आदेशनागपूर : कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले जाते किंवा नाही याची खात्री करण्यासाठी शेगाव तालुक्यातील (बुलडाणा) तरोडास्थित शाहीन फ्रोजन फूड्स व बेस्ट कोल्ड स्टोरेज या दोन मांस प्रक्रिया उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत.दोन्ही मांस प्रक्रिया उद्योगांविरुद्ध नागपूर येथील अशासकीय संस्था सुकृत निर्माण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कनकराय सावडिया यांनी अर्ज दाखल केला होता. हरित लवादाच्या पुणे खंडपीठाचे न्यायिक सदस्य न्यायमूर्ती व्ही.आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विविध आदेश देऊन हा अर्ज निकाली काढला आहे. एका आदेशानुसार दोन्ही उद्योगांना अर्जदाराला अर्जाचा खर्च म्हणून २५ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही उद्योगांना पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा-१९७४, हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा-१९८१, घातक कचरा (व्यवस्थापन व हताळणे) नियम-१९८९ व संशोधित नियम-२००० अंतर्गत परवानगी दिली आहे. परवानगी देताना मंडळाने उद्योगांचे अर्ज, उत्पादन प्रक्रिया व प्रदूषणाचा योग्य अभ्यास केला नाही. घनकचरा विल्हेवाटीचा कोठेच उल्लेख नाही. तरोडा ग्रामपंचायतीने उद्योगांचा विरोध केला होता, पण मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले.दोन्ही उद्योगांना दर महिन्याला १२०० टनावर मांस प्रक्रिया करण्याची परवानगी असल्यामुळे कत्तलीसाठी मोठ्या संख्येत जनावरांची गरज पडणार आहे. एवढी जनावरे कोठून आणणार ही बाब मंडळाने लक्षात घेतली नाही. यामुळे जनावरांची अवैध कत्तल होऊ शकते. तसेच, या उद्योगांमुळे प्रदूषण वाढून पर्यावरणाची हानी होईल, असे अर्जदाराचे म्हणणे होते. दोन्ही उद्योगांची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी विनंती अर्जदाराने केली होती. (प्रतिनिधी)हायकोर्टात होती याचिकाकनकराय सावडिया यांनी यासंदर्भात सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने काहीवेळा सुनावणी केल्यानंतर प्रकरण पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे १८ जून २०१४ रोजीच्या आदेशान्वये ही याचिका हरित लवादाकडे स्थानांतरित केली होती. उच्च न्यायालयात अ‍ॅड. मोहित खजांची यांनी याचिकाकर्त्यातर्फे कामकाज पाहिले होते.