लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार सोशल मीडियावरही प्रचार करीत आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाची सोशल मीडियावरही बारीक नजर आहे. येथील उमेदवारांनी केलेल्या प्रचाराचा खर्च त्यांच्या खात्यामध्ये जोडला जात आहे. तसेच आक्षेपार्ह पोस्टबाबत तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन कारवाई केली जात आहे.सोशल मीडियावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून जोरात प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग होत असल्याने निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांचे सोशल मीडियाच्या खात्याची उमेदवारी अर्जातच माहिती सादर करण्यास सांगितले होते. या खात्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक सायबर सेलही तयार करण्यात आला आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग करण्याकरिता निवडणूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. या सोशल मीडियावर होणारा खर्च उमेदवारांच्या खात्यात जोडल्या जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ असून १४६ उमेदवार उभे आहेत. यापैकी १०६ उमेदवारांनी सोशल मीडियाच्या खात्याची माहिती दिली आहे.परंतु सोशल मीडियावर मात्र ६० उमेदवार सक्रिय असून ३२ उमेदवार निष्क्रिय आहेत. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी एक सेल तयार करण्यात आला. त्यांच्या पोस्टवर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. विना परवानगी सोशल मीडियाचा उपयोग होत असला तरी विभागाकडून स्वत:हून दखल घेऊन कारवाई करणे शक्य नाही. तक्रार आल्यावरच कारवाई करता येते, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.भोयर खर्चात आघाडीवरसोशल मीडियावरील खर्चात कामठी विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर आघाडीवर आहेत. त्यांनी आतापर्यंत सोशल मीडियावर २० हजार रुपयापर्यंतचा खर्च केल्याची नोंद करण्यात आली. तर हिंगणा मतदार संघातील विजय घोडमारे यांनी ६०० रुपये खर्च केल्याची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra Election 2019; सोशल मीडियावर यंत्रणेचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:00 AM
विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार सोशल मीडियावरही प्रचार करीत आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाची सोशल मीडियावरही बारीक नजर आहे. येथील उमेदवारांनी केलेल्या प्रचाराचा खर्च त्यांच्या खात्यामध्ये जोडला जात आहे.
ठळक मुद्देतक्रार आल्यास तात्काळ दखल १४६ पैकी ६० उमेदवार सक्रिय