लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर परिसरातील अनेक जलमग्न झाल्या असून, काही वस्त्यांमध्ये तीन फुटापर्यंत पाणी जमा झाले होते. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांची भीती वाढविली होती. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर थांबल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.अग्निशमन विभागाला रात्री २.५० वाजताच्या सुमारास महामानवनगर बुद्धविहाराजवळच्या सांगोळकर यांच्या घरात पाणी शिरल्याची सूचना मिळाली. विभागाची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाली. यादरम्यान याच वस्तीतील सुरेंद्र बागडे यांच्या घरासह इतर १२ ते १५ घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. दुसरीकडे सक्करदरा क्षेत्रातील गिल्लूरकर रुग्णालयाच्या मागील भागातही पाणी साचल्याच्या तक्रारी विभागाला रात्री ३ वाजताच्या दरम्यान मिळाल्या. याशिवाय मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास विद्यापीठ मैदानाजवळच्या सरकारी कॉलनी परिसरात झाड पडल्याची तक्रार विभागाला प्राप्त झाली. सकाळी शिवनगरच्या प्लॉट नं. १६ बीच्या घरी झाड पडल्याची तक्रार मिळाली. सकाळी ८.४० वाजता गांधी चौक, सदर तर सकाळी ९ वाजता बाबुळखेडा, जयंती मेन्शनजवळही झाड पडल्याची तक्रार अग्निशमन विभागाला प्राप्त झाली. तापमानात घट, आकाशात ढगसोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारी १ वाजतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. दुपारनंतरही आकाशात ढग दाटले होते. सकाळी ८.३० वाजतापर्यंत नागपुरात २७.४ अंश पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे दिवस व रात्रीच्या तापमानात उल्लेखनीय घट नोंदविण्यात आली. कमाल व किमान तापमानात सामान्यपेक्षा ४ आणि ५ डिग्रीपर्यंत घट झाली होती. कमाल तापमान २९.६ डिग्री तर किमान तापमान २०.१ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ९८ टक्के होती.विदर्भात पावसाची दमदार हजेरीगेल्या २४ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात ३३ मिमी, ब्रह्मपुरीत २९, गोंदियात २१, गडचिरोलीमध्ये १८.६, बुलडाणा १२ तर वर्ध्यात ५.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. येत्या २४ तासात विदर्भाच्या अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडेही कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:17 AM
जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर परिसरातील अनेक जलमग्न झाल्या असून, काही वस्त्यांमध्ये तीन फुटापर्यंत पाणी जमा झाले होते. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांची भीती वाढविली होती. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर थांबल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ठळक मुद्देमध्यम पावसातच वाढल्या समस्या : रस्त्यावरही साचले पाणी, वाहतूक विस्कळीत