शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

गोसेखुर्द प्रकल्पासाठी जल आयोगाकडून ७५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:21 AM

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाचा ६२ हजार हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ: शेतकºयांना मिळेल थेट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यकालव्यातून बंद नलिकांव्दारे थेट शेतकºयांच्या शेतात पाणी नेण्यात येणार आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील ३०६००हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून ६२२६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. वितरिकेची कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून २०२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.शेतकºयांच्या उत्पन्नात वाढया प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकºयांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत आहे. भातासह इतर पीकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्व विदभार्साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे ७१८१० हेक्टर सिंचन निर्माण होणार असून त्यापैकी १३९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा १३ किलोमीटरचा असून यामधून ३१५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी १० ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. ४३ किलोमीटर मुख्य कालव्यातून १२३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.तीन जिल्ह्यातील शेतकºयांना लाभगोसेखुर्द प्रकल्पामधून तीन जिल्ह्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील २२९९७ हेक्टर सिंचन क्षमतेपैकी १३६९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील ८७६४७ क्षमतेपैकी २४३०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४० हजार १५६ हेक्टर सिंचन क्षमतेपैकी २४२०६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे.चार उपसा सिंचन योजनाया प्रकल्पावर चार उपससिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर ७७१० हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर १११९५ हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, तसेच अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी दिली.प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टेडिसेंबर २०१७ पर्यंत ९४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा व आॅक्टोबर २०१८ पर्यंत ११४६ दलघमी पूर्ण पाणीसाठा निर्माण करणे.धरणाचे सांडव्यामधील चार बांधकाम विमाचके बंद करण्याचे काम पूर्ण करणे.मोखाबर्डी उपसासिंचन योजना कार्यान्वित करून १४९८ हेक्टर व जून २०१८ पर्यंत अतिरिक्त ७२५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे.बंदनलिकेद्वारे ४२२०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करणे.कालव्यावरील पाच उपसासिंचन योजना जून २०१९ पर्यंत पूर्ण करणे.