लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला ५०० मेगावॉट व त्याखालील औण्षिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरिता मिशन एनर्जी फाऊंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धनविषयक स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.देशभरातील शासकीय, अर्धशासकीय आणि खासगी औष्णिक वीज केंद्रांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पाण्याची नासाडी थांबवण्याच्या दृष्टीने वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे खापरखेडा वीज केंद्र सर्वात पुढे राहिले. स्पर्धेचा निर्णय करण्यासाठी मिशन एनर्जी फाऊंडेशनने केंद्रीय विद्युत प्राधिकरणच्या आकडेवारीला आधार बनवले होते. खापरखेडा केंद्र वारेगाव राख केंद्रात राख मिश्रीत पाण्याचा पुन्हा उपयोग करीत आहे. याचप्रकारे ३० वर्षे जुन्या युनिटमधून वीज उत्पादन प्रक्रियेनंतर बाहेर निघणाऱ्या पाण्याचाही पुन्हा वापर करून खापरखेडा केंद्र पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करीत आहे. खापरखेडा केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांचे म्हणणे आहे की, वाढते तापमान, शहरीकरण आणि अपुरा पाऊस यामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याची बचत व त्याचा पुन्हा उपयोग ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक (परिचालन) चंद्रकांत थोटवे यांच्या मार्गदर्शनात पाण्याचा योग्य उपयोगासाठी खापरखेडा येथे जनजागृती अभियान चालविण्यात आले. पाण्याचे शून्य निसऱ्याचे लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच खापरखेडा केंद्राला हे यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.मागणीपेक्षा कमी उपयोगखापरखेडा वीज केंद्रात १२०००० एमएम ३ पाणी दररोज संग्रही ठेवले जात आहे. १००००० एम ३ पाण्याची मागणी आहे, परंतु खापरखेडा वीज केंद्रात जास्तीत जास्त ७५००० एम ३ पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम ३ पाण्याची आवश्यकता रिसायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.पाणी वाचवण्यासाठी काय-काय केले२१० मेगावॉटच्या जुन्या युनिटमधून दर दिवशी १७००० एम ३/ दूषित पाणी बाहेर पडत होते. ते रोखून दरदिवशी ९००० एम ३ स्तरापर्यंत आणण्यात आले.केंद्रातील कॉलनीमधील पाण्याची मागणी १२०० एम ३ पर्यंत कमी आणण्यात आली.कॉलनीतील एसटीपीमध्ये दूषित पाण्याचा पुन्हा वापर करण्याच्या क्षमतेला ५०० एम ३ प्रतिदिन वाढवण्यात आले.एसटीपीमधून पुन्हा उपयोगासाठी तयार पाण्याचा उपयोग राखेच्या देखभालीसाठीवारेगाव राख केंद्रात पुन्हा उपयोगासाठी प्राप्त होणाऱ्या पाण्याला १०००० एम ३ प्रतिदिन १७००० पर्यंत वाढवण्यात आले.
पाणी बचतीद्वारे जलसंकटावर मात : खापरखेडा वीज केंद्राचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 9:37 PM
जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला ५०० मेगावॉट व त्याखालील औण्षिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरिता मिशन एनर्जी फाऊंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धनविषयक स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्काराची मोहोर