आॅनलाईन लोकमतनागपूर : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पेंच व कन्हान नदीच्या पाणलोट क्षेत्रातही सरसरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे कन्हान तसेच पेंच नदीवरील जलाशयात अत्यल्प पाणीसाठा आहे. नागपूर शहरास येथूनच पाणीपुरवठा होते. त्यामुळे भविष्यात नागपूर शहरावर पाणीसंकट ओढवण्याचे चिन्ह आहे. अशातच महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. यातून भविष्यात नागपुरात पाणीकपात केली जाण्याचे संकेत आहेत.जलाशय व नदीत उपलब्ध पाणीसाठा पाहता नागपूर शहराला फेब्रुवारीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेची चिंता वाढली आहे. याची दखल घेत महापालिकेने आतापासून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा. आज वाचविलेले पाणी पुढील दिवसांत उपयोगात येईल, असे आवाहन म.न.पा. आयुक्त व जलप्रदाय विशेष समिती सभापती यांनी केले आहे. साधारणत: मार्च- एप्रिलमध्ये पेंच जलाशयातील पाण्याची पातळी कमी होते. त्यावेळी महापालिकेतर्फे असे आवाहन केले जाते. मात्र, आॅक्टोबरमध्ये असे आवाहन करण्यात आल्यामुळे काही महिन्यांनी नळाला दिवसाआड पाणी येण्याची किंवा कमी वेळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काटकसर करामहापालिकेतर्फे पुरविण्यात येणाºया पाण्याचा शक्यतोवर फक्त पिण्यासाठी व स्वयंपाकापुरताच वापर करावा.इतर कामाकरिता उदा. बगिचा, कपडे, धुणे, अंघोळ करणे इत्यादी करीता जास्तीत-जास्त विहिरीच्या पाण्याचा किंवा विंधन विहिरींच्या पाण्याचा वापर करावा. अंघोळीकरिता शॉवरचा उपयोग टाळावा, नळाच्या तोट्या वाहत्या ठेवू नयेत.
नागपुरात पाणीकपातीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:54 AM
त्यामुळे भविष्यात नागपूर शहरावर पाणीसंकट ओढवण्याचे चिन्ह आहे. अशातच महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देपिण्यासाठी व स्वयंंपाकासाठीच वापरामनपाचे आॅक्टोबरमध्येच आवाहनपेंच व कन्हानमध्ये अत्यल्प पाणीसाठा