शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पाणी बचतीचा संकल्प

By admin | Published: May 09, 2016 3:05 AM

सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. लाखो नागरिक तहान भागविण्यासाठी गावे सोडत आहेत.

‘लोकमत’जलमित्र अभियान : नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनचा पाठिंबानागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. लाखो नागरिक तहान भागविण्यासाठी गावे सोडत आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रच नव्हे तर संंपूर्ण देशावर ओढवलेले हे संकट दूर करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करण्याची गरज निर्माण झाली असून, यासाठी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ ने ८ मेपासून राज्यव्यापी ‘जलमित्र’ अभियानाचा प्रारंभ केला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रविवारी ‘लोकमत भवन’ येथे नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी पाणीबचतीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, असोसिएशनचे सदस्य विजय जयस्वाल, प्रकाश त्रिवेदी, नितीन त्रिवेदी व अजय जयस्वाल यांनी भाग घेतला होता. या चर्चेदरम्यान हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या अभियानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. शिवाय या उपक्रमाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नागपूर रेसिडेन्सियल असोसिएशनचे शहरात सुमारे ९० सदस्य असून, या सर्व हॉटेल्स मालकांची लवकरच एक बैठक बोलावून त्यात ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाची माहिती दिली जाईल, असे यावेळी रेणू यांनी सांगितले. चर्चेच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी अभियानाची डीपीटी प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.त्यानुसार पुढील १२ जूनपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून, यात सामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीजचा सहभाग राहणार आहे. यामध्ये लोकांना जलसाक्षर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यावेळी लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर, संतोष चिपडा महाव्यवस्थापक (रेस), मुश्ताक शेखवरिष्ठ व्यवस्थापक (रेस) व लोकमत इव्हेन्ट विभागाचे उपव्यवस्थापक आतिश वानखेडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)अपव्यय थांबलाच पाहिजेआजचा ग्राहक हा सुशिक्षित व जागरूक आहे. त्यामुळे त्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटवून देणे फार कठीण नाही. यातून नक्कीच पाण्याचा अपव्यय थांबेल. मात्र यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती आणि तो पुढाकार ‘लोकमत’ने घेतला आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या नावाखाली पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते, हे मान्य करावेच लागेल. ‘लोकमत’च्या या अभियानाचा पुढील पिढीला फार मोठा फायदा होईल. आजपर्यंत हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पाणीबचतीचा हा प्रयोग झालाच नाही. परंतु ‘लोकमत’ने या अभियानाच्या माध्यमातून हॉटेल्स मालकांना जलसाक्षर केले आहे. तेजिंदरसिंग रेणू, सचिव - नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असो.हॉटेलमधील शॉवर बंद व्हावे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पाणीबचत करणे, आज काळाची गरज ठरली आहे. यासाठी शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. हॉटेलमधील शॉवर बंद करून, केवळ नळांचा उपयोग करावा. यातून फार मोठी पाण्याची बचत होईल. नागपूर हे टुरिस्ट सेंटर नाही, येथील हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक बहुतांश व्यापारी असतात. त्यामुळे त्यांना अधिक सहजपणे पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिल्या जाऊ शकते. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये हा प्रयोग सुरू केला असून, हॉटेलमधील सर्व शॉवर बंद केले आहेत. यामधून रोज शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. प्रकाश त्रिवेदी, सदस्य - नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असो.