लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागातील मोठ्या धरणांमधीलपाणीसाठा वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (२२ ऑगस्ट) ४०.२१ टक्के इतकी भरली आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरण १०० टक्के भरले आहे.नागपूर विभागात १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ३५५३.४९ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला १४२८.८७ दलघमी (४०.२१ टक्के ) इतकी भरली आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ९.६० टक्के, कामठी खैरी २७.२५ टक्के, रामटेक १५.८२ टक्के, लोवर नांद ७२.७५ टक्के, वडगाव ८१.०४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ७८ टक्के, सिरपूर ४९.९३, पुजारी टोला ७८.६८ टक्के, कालिसरार ५१.४९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-(२) २९.१९ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर ३०.३९ टक्के, धाम ७७.९४, लोअर वर्धा ३८.२६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द ५६.४५ टक्के भरले आहेत.मध्यम तलावही ६५.९३ टक्के भरलेमोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत विभागातील मध्यम स्वरुपातील तलाव ६५.९३ टक्के भरले आहेत. विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ३५४.४२ दलघमी म्हणजेच ६५.९३ टक्के इतके पाणी साठले आहे.
नागपूर विभागातील धरणात पाणीसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:04 PM
विभागातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (२२ ऑगस्ट) ४०.२१ टक्के इतकी भरली आहेत.
ठळक मुद्दे४०.२१ टक्के धरणे भरली : असोलामेंढा, दिना, पोथरा हाऊसफुल्ल