नागपूर : गोरेवाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ ६०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीवर गळती होत असून दुरुस्तीच्या कामासाठी आणि दाभा कमांड एरिया इंटरकनेक्शनच्या कामासाठी पेंच २ चे एलटी फीडरचे १२ तास शटडाऊन करण्यात आले आहे. हे शटडाऊन २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार आहे. त्यामुळे दाभा भागातील वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा खंडित होणार आहे.
दाभा येथील दाभा जुने जलकुंभ, टेकडीवाडी जलकुंभ, दाभा १ व दाभा २ हे जलकुंभ आहे. या जलकुंभावरून शेकडो वस्त्यांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या वस्त्यांमध्ये शनिवारी नियमित पाणी पुरवठा होणार नाही.
- या वस्त्यांना पाणी पुरवठा नाही
दाभा वस्ती, वेलकम सोसायटी, आशादीप सोसायटी, आदिवासी सोसायटी, सरकारी प्रेस सोसायटी, अंबर कॉलनी, संत ताजुद्दीन सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, मेट्रोसिटी सोसायटी, गणेशनगर, शिवहरे लेआऊट, संत जगनाडे सोसायटी, न्यू शांती नगर, हिल व्ह्यू सोसायटी , ठाकरे लेआऊट, उत्कर्षनगर, एअरफोर्स कॉलनी, गवळीपुरा, खाटीपुरा, वायुसेनानगर, खडगी आटाचक्की, गायत्रीनगर, मनोहर विहार कॉलनी, कृष्णानगर, सरोजनगर, चिंतामणीनगर, टेकडी वाडी, झोपडपट्टी ११ गल्ली, वैष्णोमाता नगर, सारीपुत्र नगर, ओमशांती लेआऊट, मंगलमूर्ती लेआऊट, दांडेकर लेआऊट, वैभवनगर, अमिता सोसायटी, जीएनएसएस सोसायटी, साईनगर, डोबीनगर, लोकमान्य सोसायटी, त्रिलोकपूर्णा सोसायटी, देशमुख लेआऊट, सुख सागर सोसायटी, साई झोपडपट्टी, जयस्वाल शाळा, जगदीशनगर, मसोबागल्ली, केजीएन सोसायटी, डुंबरे लेआऊट, वेलकम सोसायटी, मकरधोकडा, गंगानगर, प्रिती सोसायटी, अनुपमा सोसायटी, गायकवाड ले-आऊट, सांदीपनी शाळा, वुडलँड सोसायटी, कृषक महिला सोसायटी, सुखसागर लेआऊट, शिवनगर लेआऊट, भाकरे लेआऊट, यशोपुरम सोसायटी, जय संतोषी माँ लेआऊट.