लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वॅपकॉस लिमिटेड या अमृत योजनेंतर्गत अनोंदणीकृत व स्लम वस्त्यांमध्ये गोधनी-गोरेवाडा ४००मिमी फीडर मेनवर आंतरजोडणीचे काम करण्यासाठी उद्या बुधवारी सकाळी १० ते २५ गुरूवारी सकाळी १० दरम्यान जलवाहिन्या टाकण्याचे काम करणारी कंपनी शटडाउन घेत आहे. या दरम्यान, मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी इतरही काही महत्वाची कामे हाती घेण्याचे ठरविले आहे. यात हनुमान नगर इनलेट व आऊटलेट व्हॉल्व बदलणे आणि पेंच १ येथील इलेक्ट्रिकल यार्डात आयसोलेटर बदलण्याचे कामांचा समावेश आहे. यामुळे पेंच १ गोरेवाडा २४ तास बंद राहणार असल्याने गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोन्सचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बाधित राहणारा भाग
गांधीबाग झोन (मेडिकल फीडर): कोठी रोड, गाडीखाना, नवी शुक्रवारी, कर्नल बाग, रामाजी वाडी, सुभाष रोड, घाट रोड, जोहरीपुरा, चांडक ले आऊट, इंदिरा नगर, जाटतरोडी, रामबाग, इमामवाडा, रामबाग म्हाडा, मेडिकल, बारा सिग्नल, पटेल टिम्बर मार्केट, उंटखाना, राजाबाक्षा, घाट रोड
धंतोली झोन: वंजारी नगर, सोमवारी क्वार्टर, वकीलपेठ, रघुजी नगर, हनुमान नगर, सिरसपेठ, रेशीमबाग, चंदन नगर, ओम नगर, शिव नगर, महावीर नगर, आनंद नगर, भागात कॉलनी, रघुजी नगर, सुदामपुरी, जुने नंदनवन, तिरंगा चौक, नेहरू नगर, कबीर नगर, गायत्री नगर, अजनी रेल्वे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कुकडे लेआऊट, कौशल्या नगर, बाभूळखेडा, चंद्रमणी नगर, विलास नगर, वसंत नगर
धरमपेठ झोन: : राजभवन बर्डी लाईन बर्डी मेन रोड, टेकडी रोड, कुंभारटोली, नेताजी मार्केट, तेलीपुरा, आनंद नगर, मोदी नं. १,२,३, गणेश मंदिर, रामदासपेठ, महाराजबाग रोड.
मंगळवारी झोन: राजभवन छावणी लाईन; छावणी, राजनगर, मेकोसाबाग, बयरामजी टाऊन ख्रिश्चन कॉलनी, विजय नगर, न्यू कॉलनी, पागलखाना, गड्डीगोदाम, माउंट रोड, बुटी चाळ, खेमका गल्ली, तुकाराम चाळ, रेड क्रॉस रोड, सदर व सदर पोलीस लाईन भाग, नई बस्ती, सिंधी कॉलनी, कडबी चौक, क्लार्क टाऊन, लुंबिनी नगर, गौतम नगर
गोरेवाडा सीएसआर : नटराज सोसायटी, दर्शन सोसायटी, एकता नगर, नर्मदा सोसायटी, माधव नगर, प्रकाश नगर, उज्वल नगर, गणपती नगर, शिव नगर, काळे लेआऊट, जय दुर्गा नगर, केशव नगर, वेलकम सोसायटी, राष्ट्रसंत नगर, शबिना सोसायटी, श्रीकृष्ण नगर, आशीर्वाद नगर, सुमित नगर, गायत्री नगर, बाबा फरीद नगर, बंधू नगर, एमबी टाऊन १, २ व ३, माता नगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, गीता नगर, डोये ले आऊट, आदर्श नगर, मनवर ले आऊट, साईबाबा कॉलनी, फरस.
सतरंजीपुरा झोन: राजभवन बोरियापुरा फीडर मेन: लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, सैफी नगर, अन्सार नगर, डोबी, कमल बाबा दर्गा, हंसापुरी, भगवाघर चौक, मोमिनपुरा, शेख बारी चौक, नाल साब चौक काला झेंडा तकिया, भानखेडा, दादरा पूल टिमकी, गोळीबार चौक, कोसारकर मोहल्ला, नंदबाजी डोहा, समता बुद्ध विहार, सपाटे मोहल्ला, दांदरे मोहल्ला, देवघरपुर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, पिली मारबत, धापोडकर गल्ली (तांडापेठ), लाल दरवाजा, मुसलमानपुरा, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी तेलीपुरा, मिरची बाजार चौक, भाजीमंडी, लोहाओळी, रेशम ओळी, बर्तन ओळी, बाजीराव गल्ली, तीन नळ चौक, खापरीपुरा, भिशीकर मोहल्ला, भाजी मंडी, टांगा स्टँड, संभाजी कासार, ढीवरपुरा, राम नगर, बांगलादेश, उमाटेवाडी, बैरागीपुरा, तेलीपुरा पेवठा, बारईपुरा, मिरची मंदिर भाग, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक आदी. शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.