लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जयताळा आणि टाकळी सीम मुख्य जलवाहिनीवर ५०० मिमीचा व्यासाचा जुना स्लुइस व्हॉल्व बदलवून नवीन व्हॉल्व लावला जाणार आहे. यासाठी १२ तासांचे शटडाऊन घेणार असल्याने उद्या गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
...
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग
जयताळा जलकुंभ: रमाबाई आंबेडकर नगर, नालंदा नगर बुद्ध् विहार , जयताळा मेनरोड, वडस्कर ले -आऊट, ससाणे ले-आऊट, तुलसी विहार, महेंद्र कॉलनी, मत्राज सोसायटी, जनहित सोसायटी, हिरणवार ले-आऊट, स्मशानघाट व नालंदा नगर बुद्ध विहार
टाकळी सीम जलकुंभ: हिरणवार ले-आऊट, प्रसाद नगर, म्हाडा कॉलनी, नेल्को सोसायटी, शास्त्री ले-आऊट, सुभाष नगर, मंगलधाम सोसायटी, टाकळी सीम, यशोदा नगर, वासुदेव नगर, एसबीआय कॉलनी, लुंबिनी नगर, राजेंद्र नगर व कल्याण नगर