लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा काही काळासाठी खंडित झाला आहे. आधीच शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाताे. त्यातच पाईपलाईन फुटल्याने शहराला पुढील दाेन दिवस पाणीपुरवठा हाेणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद प्रशासनाने केले आहे.
कळमेश्वर ब्राह्मणी शहराला स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी इटनगाेटी जलाशयातून पाण्याची उचल केली जाते. ही मुख्य पाईपलाईन गुरुवारी (दि. ३) फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ती दुरुस्त करण्यासाठी दाेन दिवसांचा अवधी लागणार असल्याने शहराला दाेन दिवस पाणीपुरवठा करणे शक्य हाेणार नाही, असेही नगर पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कळमेश्वर ब्राह्मणी शहर व परिसरातील जलस्त्राेत दूषित असल्याने शहरवासीयांना नळाच्या पाण्यावाचून गत्यंतर नाही. त्यातच पाणीटंचाईमुळे शहराला आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. फुटलेल्या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आणि दाेन दिवसा नळाला पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करीत सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.