शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

वर्षभरात नागपूर शहरात २४ तास पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:50 PM

डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देजलप्रदाय समितीला विश्वास : शहराला टँकरमुक्त करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु काही ठिकाणी काम करताना अडचणी येत आहे. या अडचणींवर मात करून डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला. महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.पहिल्या टप्प्यात शहरातील ठराविक भागात २४ बाय ४ योजना राबविण्यात आली. काही भागात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी काम करताना अडचणी आल्या. यामुळे कामाला विलंब झाला. याचा परिणाम प्रकल्पाच्या कामावर झाला. कामाची गती वाढवून वर्षभरात संपूर्ण शहराला २४ तास पाणी उपलब्ध करण्यात येईल. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती झलके यांनी दिली.बैठकीला समिती उपसभापती भगवान मेंढे, झोन सभापती समिता चकोले, राजकुमार साहू, विरंका भिवगडे, गार्गी चोपरा, समिती सदस्य संजय महाजन, दीपक चौधरी, भुट्टो जुल्फेकार अहमद, वैशाली नारनवरे, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, संचालक एचआर आणि जनसंपर्क केएमपी सिंग, संचालक राजेश कारला प्रामुख्याने उपस्थित होते.शहरातील पाणीपुरवठा संबंधीचा झोननिहाय आढावा घेतला. हुडकेश्वर नरसाळा भागात पाणीपुरवठा व नळ जोडणीची माहिती घेतली. या भागात आतापर्यंत ओसीडब्ल्यूने किती कामे केली, किती नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली, याबाबतचा अहवाल समितीच्या पुढील बैठकीत सादर करा, जलवाहिनीच्या कामासाठी वा दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश झलके यांनी दिले. समिता चकोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला.धंतोली झोनअंतर्गत काही वस्त्यांमध्ये मीटर चोरून जाण्याची तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली.मीटर चोरीच्या तक्रारी असेल तर यासंदभांत पोलिसात गुन्हा दाखल करा, गांधीबाग झोनमधील पाणीपट्टीची थकबाकी वसूल करा, थकबाकी न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले. जलप्रदाय विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या तीन गणेशोत्सव मंडळांना बक्षीस वितरण करण्याचा कार्यक्रम महापौर कक्षात घ्यावा, अशी सूचना झलके यांनी केली.अमृत योजनेमुळे शहर टँकरमुक्त होईलअमृत योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑगस्ट २०२० पर्यत या योजनेचे काम पूर्ण होईल, असे बॅनर्जी यांनी सांगितले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ५० विहिरींवर आरओ युनिट लावण्यात येणार असल्याची त्यांनी दिली. दहा झोनमधील पाच अशा ५० विहिरी निवडल्या आहे. यामध्ये आरओ युनिट लावून त्यावर वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर बसविणारनवेगाव व पेंच जलाशयातून उचल केलेल्या पाण्याची कुठे गळती होते याचे निदान लवकर होत नाही. अशा अडचणी लक्षात याव्या, याकरिता अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर लावण्यात येणार असल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी