लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा व ओसीडब्ल्यू यांनी सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवारी फीडर मेनला व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बस्तरवारी १, २ अ, २ ब या जलकुंभांवर १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवारी या जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
बस्तरवारी १ जलकुंभ : लालगंज, तेलीपुरा पेवठा, कैमीबाग, प्रेमनगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, दहीबाजार. दलालपुरा चौक, खैरीपुरा, झाडे चौक.
बस्तरवारी २ अ जलकुंभ :- मेहंदीबाग, किनखेडे ले-आऊट, जामदारवाडी, वृंदावननगर, शाहू मोहल्ला, कुंदनलाल गुप्तानगर, पोळा मैदान, नामदेवनगर, इंदिरानगर, कोलबास्वामीनगर, पाठराबेवाडी, जोशीपुरा, सोनारटोली, आनंदनगर, कांजी हाऊस चौक.
बस्तरवारी २ ब जलकुंभ :- बांगलादेश. तांडापेठ, नाईकतलाव, संभाजी कासार, मुसलमानपुरा, लेंडी तलाव, लाडपुरा, नंदगिरी रोड, स्वीपर कॉलनी, ठक्करग्राम, पाचपावली, विणकर कॉलनी व मराठा चौक.