लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी रविभवन येथे दुष्काळाबाबतचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि. प.चे प्रभारी सीईओ अंकुश केदार, महसूल आणि कृषी विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, केंद्राच्या निकषानुसार १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून मदतीसाठी ७ हजार ९०० कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. नुकतीच केंद्राचे पथक पाहणी करून गेले. लवकरच त्यांच्याकडून मदळ मिळेल. शासनाने २६८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याकडून जाहीर करण्यात आलेल्या २६८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा भार शासन उचलणार आहे. भविष्या दुष्काळी गावांची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. काही गाव वगळल्याचा आरोप होत आहे. अशा गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालावरुन संबंधित गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात येईल. नागपूर जिल्ह्यात १८ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे टँकर बंद करून दुरून पाईप लाईनने पाणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक सोमवारी मंत्रालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दुष्काळी भागात पाईपलाईनने पाणी : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:54 PM
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
ठळक मुद्देदर सोमवारी आढावा बैठक