नागपूर : महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी सतरंजीपुरा झोन अंतर्गत बस्तरवाडी जलकुंभ येथे आंतरजोडणी, आणि नवीन नेटवर्क चार्ज करण्यासाठी ३० तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आज, बुधवारी रात्री १० ते शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत तीन जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात बस्तरवारी १, बस्तरवारी २ आणि बस्तरवारी ३ अशा तीन जलकुंभांचा समावेश आहे. या दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार नाही.
पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग
बस्तरवारी १ जलकुंभ - लालगंज, तेलीपुरा पेवठा, कौमी बाग, प्रेम नगर, नारायण पेठ, श्रीरामवाडी, दही बाजार, दलाल पुरा चौक, खैरीपुरा, झाडे चौक, आंबेडकर पुतळा बरैपुरा, जसवंत चौक, मांगपूर, माटेपुरा, खैरीपूर, पंगा पुरा, देवघरपुरा, स्वीपर कॉलनी रामदाल आखडा, सातपुते मोहल्ला, बाहुली विहीर, झाडे चौक आणि गोंड पुरा व इतर परिसर बांगलादेश, तांडापेठ, नाईक तलाव, संभाजी कासार, मुसलमानपुरा, लेंडी तलाव, लाडपुरा, नंदगिरी रोड, स्वीपर कॉलनी, ठक्कर ग्राम, पाचपावली, विणकर कॉलोनी, मराठा चौक, चकना चौक.
बस्तरवारी २ जलकुंभ - लालगंज, खैरीपुरा ओम हाय स्कूल, लालगंज पोलीस चौकी, नाईकवाडी, चकना चौक, नाईक तलाव, बंगला देश, बजरंगीपुरा, राऊत चौक, बरे पुरा, राम नगर, संभाजी कासार, धीवर पुरा, बंगाली पंजा, लेंडी तलाव, मुसलमान पुरा, लाल दरवाजा, तांडापेठ- जुनी आणि नवीन वस्ती, उमाटे वाडी, आदर्श विणकर कॉलोनी, दारव्हेकर दंगल, लाड पुरा, नांदगिरी रोड, स्वामी नगर, पाचपावली शास्त्री गार्डन कुंभार पुरा, मोचीपुरा, मेहेंदी बाग, किनखेडे ले-आऊट, जामादारवाडी, वृंदावन नगर, शाहू मोहल्ला, कुंदनलाल गुप्ता नगर, पोळा मैदान, नामदेव नगर, इंदिरा नगर, कोलबास्वामी नगर, पाठराबे वाडी, जोशीपुरा, सोनार टोली, आनंद नगर, हुडो कॉलनी, कांजी हाऊस चौक.
बस्तरवारी ३ जलकुंभ - मेहंडीबाग कॉलोनी, जामदरवाडी, पोळा मैदान, किनखेडे ले -आउट, नामदेव नगर, बापू अणे नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, इंदिरा गांधी नगर, कांजी हाऊस चौक, कोलबास्वामी नगर, वृंदावन नगर नामदेव नगर, देशमुख ले -आउट, आनंद नगर, जय भोले नगर, बिनाकी मंगळवारी, राणी दुर्गावती चौक व सोनार टोळी.