नागपूर : जलप्रदाय विभागात दुरूस्तीची कामे करताना नियोजन नसल्याने ऐन नवरात्रोत्सवात सतरंजीपुरा झोनमधील कळमना व वांजरी जलकुंभाचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. वांजरा रेल्वेलाइन खाली असलेली जलवाहिनीची गळती दुरूस्ती करण्यासाठी बुधवारी सकाळी १० ते गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जलवाहिनीची गळती अचानक उद्भवलेली नाही. त्यामुळे ही दुरुस्ती नवरात्रोत्सवापूर्वी व नंतरही घेणे शक्य होते. मात्र नियोजन नसल्याने शटडाऊनचा घोळ सुरू असल्याची माहिती आहे. शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारे ही पाणीपुरवठा होणार नसल्याने पाणी साठवण्याची व्यवस्था नसलेल्या नागरिकांची अडचण होणार आहे.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग
वांजरी जलकुंभ : राजीव गांधी नगर, संतोष नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, विनोबा भावे नगर, नागसेनवन , वनदेवी नगर, बेले नगर, कामना नगर, वैभव लक्ष्मी नगर, मेमन कॉलनी, वैष्णोदेवी नगर गुलशन नगर, पांडुरंग नगर, बबळेश्वरी नगर, देवी नगर, त्रिमूर्ती नगर आणि वांजरी जुनी वस्ती.
कळमना जलकुंभ : कळमना वस्ती, गणेश नगर, समाज एकता नगर, वाजपेयी नगर, नागराज नगर, म्हाडा कॉलनी आणि नजीकचा भाग