लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण तांदळाचे अनेक प्रकार पाहिले आहेत. सुगंधीत तांदळाचेही विविध प्रकार आहेत. परंतु तांदूळ म्हटला की त्याचा रंग हा पांढराच असणार हे गृहित. मात्र काळा आणि लाल रंगाचा तांदूळही आपल्या देशात पिकवला जातो, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. परंतु हे खरे आहे. ओडीसामध्ये काळा आणि लाल रंगाचा तांदूळ पिकवणारे शेतकरी आहे. यासोबतच आंबे हळद, सहज खाता येईल अशी लोणच्याची हळद आदींसह देशभरातील विषमुक्त पदार्थ अनुभवणारे एकमेव स्थळ म्हणजे ‘बिजोत्सव’. सीताबर्डी येथील म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात सुरु असलेल्या बिजोत्सवात नागपूरकरांना याचा अनुभव घेता येईल.देशी वाण व विषमुक्त उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी वाण उपलब्ध व्हावे, तसेच सेंद्रीय शेतीचाही प्रचार प्रसार व्हावा, या उद्देशाने या उद्देशाने बिजोत्सवाला सुरुवात झाली. बिजोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. यंदा म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात बिजोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ८ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून हा एकप्रकारचा बीज लोकशाहीचा उत्सव आहे.या बिजोत्सवात आयोजित प्रदर्शनात गडचिरोलीपासून ते पंजाब आणि आंध्र प्रदेश ते ओडिसापर्यंतच्या शेतकरी आपापल्या देशी वाण व शेतमालासह सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र म्हणजे काळा व लाल तांदूळ होय. ओडीसा भुट्टी बहल, बरगर येथील अनिता साहू या महिला शेतकºयांच्या स्टॉलवर हा तांदूळ पाहायला मिळतो. साहू यांच्या स्टॉलवर जवळपास १५० प्रकारच्या धानाच्या विविध जाती आहेत. यात काळा व लाल तांदूळ हे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय ओडीसाच्याच कोरापूर येथील सुरेंद्र मोस्मी या शेतकºयांने धानाच्या ८० जाती प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. वर्धा ता. समुद्रपूर , पवनगाव येथील ब्रम्हानंद हे हळदीचे उत्पादन करतात. त्यांनी सध्या आंबे हळद आणि लोणच्याची हळद विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. भिवापुरी मिरची वायगाव हळद, फरीदकोट पंजाब येथील खेती विरासत मिशनने विविध जातीच्या भाजीचे वाण, कोलकाता येथील एमजी ग्रामोद्योग सेवा संस्थेचे देशी कॉटनचे कपडे आदी येथे पाहायला मिळते.यासोबतच परंपरागत बियाणे, विषमुक्त व सेंद्रिय शेतमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने, पर्यावरण पूरक उपयोगी साधने, शहरी कचरा व्यवस्थापन, गच्चीवरील शेती, धूरमुक्त स्वयंपाक, रानमेवा, वनोपज, खादी यावरील स्टॉल्स बीजोत्सवात उपलब्ध आहेत.शुक्रवारी या बीजोत्सवाचे दोन बंजारा समाजातील महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले. यावेळी अमिताभ पावडे, मनोहर परचुरे, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. तारक काटे, आकांक्षा नवघरे, प्राची माहुरकर, सजल कुलकर्णी, प्रवीण मोते, वसंत फुटाणे, अतुल उपाध्ये, प्राजक्ता उपाध्ये, कीर्ती मंगरुळकर, निशांत माटे, शामला संन्याल, रुपींदर नंदा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.देशी बियाणे काळाची गरज - अमिताभ पावडेविविध कंपन्यांच्या बियाण्यांमुळे रासायनिक कीटकनाशक व फवारणींचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जमिनीची पत घसरली असून अन्नातील विषारीपणा वाढला आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, विविध आजारांना आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता देशी बियाणे वापरणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी विषयाचे तज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी येथे केले.बीजोत्सवांतर्गत बी.टी., एच.टी. कापूस नकोच या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. जीएम कापूस व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, रासायनिक फवारणीमुळे पिकांवरील अळी मारली जाते. त्यात घातक घटक असतात. फवारणीतील घटक कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मानवाच्या शरीरातही पोहोचत असतात. परिणामी मानव आजराला निमंत्रण देत असतो. यासाठी सेंद्रिय शेती आवश्यक आहे. परंतु त्याला शास्त्रज्ञांनी परवानगी देण्याची गरज आहे. तसेच जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांना देशी बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठीच बीजोत्सव हा प्लॅटफॉर्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘सेंद्रिय शेतीतील अर्थकारण’ या विषयावर बोलताना डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, बी.टी म्हणजे विष होय. विषाचे उत्पादन करणे होय, यासाठी सर्वस्वीपणे सरकार जबाबदार आहे. सर्व बियाण्यांची नावे ही केवळ इंग्रजीमध्ये असतात. त्याचा उपयोग कसा करायचा हे ही इंग्रजीतच असते. अशा वेळी दुकानदार जे सांगेल तेच शेतकऱ्याला खरेदी करावे लागते. दुकानदार हे त्याला मिळत असलेल्या कंपनीच्या कमिशननुसार बियाणे खरेदी करावयास सांगत असतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. देशी बियाणे वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत होऊ शकते. एनएसएसचे विद्यार्थी उपयोगी ठरू शकतात. आजवर कृषीधोरण हे उद्योगपतीच ठरवत आलेले आहेत. आता उद्योगाचे धोरण शेतकऱ्यांनी ठरविण्याची गरज आहे, यासाठी चॅलेंज करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वसंत फुटाणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.मेकर्स अड्डा
अबब, नागपुरात लाल आणि काळा तांदूळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 8:29 PM
आपण तांदळाचे अनेक प्रकार पाहिले आहेत. सुगंधीत तांदळाचेही विविध प्रकार आहेत. परंतु तांदूळ म्हटला की त्याचा रंग हा पांढराच असणार हे गृहित. मात्र काळा आणि लाल रंगाचा तांदूळही आपल्या देशात पिकवला जातो, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. परंतु हे खरे आहे. ओडीसामध्ये काळा आणि लाल रंगाचा तांदूळ पिकवणारे शेतकरी आहे.
ठळक मुद्दे‘बीजोत्सव’ला प्रारंभ