आॅनलाईन लोकमतनागपूर : आम्ही अंध आहोत आणि बहुतेक कामासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. असे असताना आम्ही शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करू शकतो. तुम्ही तर डोळस आहात आणि हे सुंदर जग पाहू शकता. आम्ही अंध असून करू शकतो, मग तुम्ही का नाही? निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग करा, चांगले शिक्षण घ्या, अशी प्रेरणादायी दृष्टी अंध विद्यार्थ्यांनी फूटपाथवरील मुलांना दिली. निमित्त होत लुई ब्रेल यांच्या जयंतीचे.ब्रेल लिपीचे संशोधन करून बोटांच्या मदतीने दृष्टिहीनांपर्यंत ज्ञानाचा प्रकार पोहोचविणारे लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आत्मदीपम सोसायटी आणि उपाय या संस्थेच्यावतीने वसंतराव नाईक झोपडपट्टी येथे फूटपाथवरील मुलांसाठी शाळा भरविण्यात आली. फूटपाथवर भटकणाºया मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला. अंध लोकही वाचू आणि लिहू शकतात, याची माहितीच कदाचित फूटपाथवरच्या मुलांना नसावी. यासाठी आत्मदीपम सोसायटीच्या अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपीतील गाणी आणि गोष्टी मुलांना सांगितल्या. शिक्षणामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करण्याची क्षमता आपल्याला मिळते, असे सांगून, आत्मदीपम् सोसायटीच्या सोनाली चवलढाल, प्रशांत पवनीकर, प्रशांत वरुडकर यांनी फूटपाथवरील मुलांचा दोन तास वर्ग घेतला.वरुण श्रीवास्तव यांच्या विचारातून सुरू झालेल्या ‘उपाय’ या संस्थेतर्फे नागपूर शहरात आठ ठिकाणी फूटपाथवर सायंशाळा घेण्यात येतात. संस्थेचे तरुण स्वयंसेवक फूटपाथवर राहणाºया लोकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात ६ ते १४ वयोगटातील मुलांचा महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश निश्चित करून, त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम संस्था करीत आहे. भारतात २६ मुख्य सेंटर असून, अनेक ठिकाणी फूटपाथ शाळा भरते. एवढेच नव्हे तर गरीब मुलांना शिकविण्याचे कार्यही संस्थेच्या माध्यमातून केले जाते. आत्मदीपम सोसायटीने याच फूटपाथ शाळेत हा वर्ग घेतला. लुई ब्रेल यांनी अंधांना ब्रेल लिपी बहाल करून त्यांनी अंधांच्या जीवनात प्रकाश पोहोचविला व जगण्याचा अर्थ दिला. समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच आमची तळमळ आहे. अंध असूनही जग ज्ञानाने प्रकाशित करण्याचा संकल्पच आम्ही केला आहे.- जिज्ञासा चवलढाल, संस्थापिका आत्मदीपम् सोसायटी
आम्ही शिक्षण घेऊ शकतो, तुम्ही का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 9:57 PM
आम्ही अंध आहोत आणि बहुतेक कामासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. असे असताना आम्ही शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करू शकतो. तुम्ही तर डोळस आहात आणि हे सुंदर जग पाहू शकता. आम्ही अंध असून करू शकतो, मग तुम्ही का नाही? निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग करा, चांगले शिक्षण घ्या, अशी प्रेरणादायी दृष्टी अंध विद्यार्थ्यांनी फूटपाथवरील मुलांना दिली.
ठळक मुद्देअंध विद्यार्थ्यांनी फूटपाथवरील मुलांना दिली दृष्टीआत्मदीपम व उपायचे पाऊल