ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १८ - नागपूरची मेट्रोे रेल्वे आमच्या सरकारने मंजूर केली. सर्व बाबींना आम्ही मंजुरी दिली व सत्ताबदल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येत भूमीपूजन केले. आमच्या कामांचे श्रेय घेतले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली. सोबतच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या आपसातील भांडणामुळे मेट्रोचे भूमीपूजन आमच्या सरकारच्या काळात होऊ शकले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.