शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

आम्ही एक वर्षाने मोठे होऊ!

By admin | Published: December 31, 2014 1:08 AM

रात्री-बेरात्री लहानग्यांना कोण घराबाहेर निघू देणार? पण आई-बाबांना पटवण्यात छोट्यांची मोठी कर्तबगारी असते. म्हणूनच नागपुरातील बच्चे मंडळीही ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनमध्ये मागे हटलेली नाही.

बच्चे कंपनीचे न्यू इयर प्लॅनिंगनागपूर : रात्री-बेरात्री लहानग्यांना कोण घराबाहेर निघू देणार? पण आई-बाबांना पटवण्यात छोट्यांची मोठी कर्तबगारी असते. म्हणूनच नागपुरातील बच्चे मंडळीही ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनमध्ये मागे हटलेली नाही. मम्मी-पप्पांना आवडणार नाही, अशा गोष्टींचा हट्ट न धरता त्यांनी नव्या वर्षाचे कार्यक्रम आखले आहेत. विशेष म्हणजे, वर्षभर पाच-पाच रुपयांचे नाणे जमा करून त्यांनी या सेलिब्रेशनसाठी पैसे जमविले आहेत. अशा उत्सवाला कोणते आई-बाबा अडवणार? शेवटी छोटे छोटे आनंदच आयुष्याला मोठा करतात ना?नवीन वर्षाची छोटी का होईना पार्टी झालीच पाहिजे, यासाठी लहानग्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील अपार्टमेंट, गल्लीबोळात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग रेडी आहे. कोणी गच्चीवर पार्टी करणार आहे तर, कोणी सोसायटीच्या पार्किंगच्या जागेत. ‘काकू, १० रुपये तरी वर्गणी द्या ना!’ अशी बालविनंती बिल्डिंगमध्ये सध्या ऐकू येत आहे. न्यू इयरसाठी कॉलेज युवक-युवती हॉटेल, पिकनिककडे वळतात. शाळेत जाणाऱ्या लहानग्यांचे सेलिब्रेशन मात्र वर्गणीवर अवलंबून आहे. ‘मोठी पार्टी नाही करणार, मात्र छोटा केक तर आणू ना!’असे म्हणत ते पार्टीचे प्लॅनिंग करीत आहेत. मैत्रिणीच्या घरी करू पार्टीशाळेतल्या मुलींना थर्टी फर्स्ट बाहेर करण्याची परवानगी नसते. मात्र घरी बसून कंटाळा येतो. त्यामुळे मैत्रिणीच्या घरी जाऊन पार्टी करण्याचा बेत सोमलवार निकालसच्या मैत्रिणींनी आखला आहे. त्या म्हणाल्या, ‘मागच्या वर्षी आम्ही बाहेर गेलो होतो. यायला थोडा उशीर झाल्याने आई-बाबा रागावले होते. त्यामुळे आता यावर्षी थर्टी फर्स्ट करायचा असेल तर लांब जाऊ नको, असे बाबा म्हणाले. आम्ही चार मैत्रिणी आजूबाजूलाच राहतो. एकीच्या घरी एकत्र येऊन १२ वाजता केक कापू आणि कोल्ड ड्रिंकसुद्धा आणू.’सरांचे हटके करणार ‘वेलकम’कॉम्युटर क्लासमध्ये जुळलेल्या मित्रांचा एक ग्रुप तर अगदी जल्लोषात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करणार आहे. राजेश, राकेश, पवन, राहुल, अजय म्हणाले ‘नये साल के पहले दिन हम सर लोगों को अलग तरीकेसे वेलकम करनेवाले है.’ ‘शिक्षकांचे हे अलग स्वागत कसे असणार आहे? मुलं म्हणाली, ‘त्या दिवशी आम्ही सरांना कॉम्प्युटरपुढे बसवणार. आम्ही पॉवर पॉर्इंटमध्ये तयार केलेल्या हटके स्लाईडस् त्यांना दाखवणार आहोत. सरांचे असे स्वागत केल्यानंतर मुलं अंताक्षरी खेळणार आहे. या सेलिब्रेशनसाठी ते संपुर्ण क्लास सजविणार आहेत. त्यासाठी त्यांनी दोघादोघांची टीम तयार केली आहे. प्रत्येकाकडे कामं वाटून त्यांची तयारी सुरू आहे. मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी. वाहते पाणी... नव्या वर्षाचे आगमन म्हणजे बालमनाला आनंदाची मेजवानीच! मोठ्यांप्रमाणेच लहानग्यांनीही ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनसाठी नानाविध कार्यक्रमांचा बेत केला आहे. पिकनिक, डान्स, अंताक्षरी अशी त्यांची भलीमोठी यादी रेडी आहे. पण त्यासाठी कुणीही आईची पर्स किंवा बाबांचे खिसे हुडकले नाहीत. स्वत:च्या कल्पकतेने ‘टीनएजर्स’ कंपूचा ‘थर्टी फर्स्ट’ झोकात साजरा होणार आहे. चिमुकल्यांची भिस्त वर्गणीवरचआपले दादा, ताई थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करीत असल्याचे पाहून लहानग्यांनाही पार्टी करण्याची इच्छा होते. पण दादा, ताईसारखा पॉकेटमनी मिळत नाही. मग वर्गणीवरच या लहानग्यांची भिस्त असते. त्यासाठी ते बिल्डिंगभर फिरतात. काही वेळेस एखाद्या काकू म्हणतात, ‘आता नको येऊ. मी स्वयंपाक करते आहे.’ एखादे काका म्हणतात, ‘वर्गणीचं तुम्ही काय करणार?’ पण १० रुपये तरी द्या ना, छान पार्टी करू, तुम्हीसुद्धा या गच्चीवर.’असे म्हणत हे लहानगे पार्टीसाठी कसेबसे पैसा जमा करतातच. (प्रतिनिधी)मला मित्रच नाहीतखामला येथील हर्ष म्हणाला,‘आमच्या बिल्डिंगमध्ये मुलंच नाहीत. शाळेतले मित्रही दूर राहतात. त्यामुळे आई घरीच काही तरी करते. मागच्या वर्षी आईने पावभाजी केली होती. यावर्षी पाणीपुरी किंवा पिझ्झा करणार आहे. केकसुद्धा आणू आणि टीव्हीवर कार्यक्रम पाहू.’अपार्टमेंट, गल्लीबोळात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंगगच्चीवर, पार्किंगच्या जागेत होणार सेलिब्रेशनआओ साथीयों रोकनेशिक्षा पर हो रहे हमले कोसंगबद्ध सामूहिक होकरमानव मुक्ती के बंद दरवाजेआओ खोलनेआओ साथीयों