नागपूर : तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने प्रगती होत असून त्याचे नकारात्मक परिणाम देखील दिसून येत आहे. देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सर्व सामान्यांना हाताळता येतील असे तंत्रज्ञान हवे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले.
विद्यापीठाच्या महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रा. प्रमोद वाटकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ठाकूरवाडा येथील ९९ वर्षिय ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी डॉ. पुंडलिकराव गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र सुनील गेडाम यांनी हा सत्कार स्वीकारला. यावेळी डॉ. ज्योतीमणी यांचा देखील शैक्षणिक कार्यातील सहभागा विषयी सत्कार करण्यात आला. यासोबतच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद वाटकर यांनी केले. संचालन पौर्णिमा रामेकर व आशा वर्मा यांनी केले.
- पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
गांधी जयंती सप्ताह निमित्त आयोजित स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेतील विजेते आशुतोष पोद्दार, गणेश वाळके, युवराज सिंह चौहान, लिशा पोफरे, पूर्वी शेलूकर, चित्रकला स्पर्धेतील मंथन इंगोले, सूर्यांशू बोरेकर,काव्या मेश्राम, प्रयास मेश्राम, अलेक्स पेड्रल, ऋतुजा गेडाम, राधा बागेकर, आरिया लवात्रे, अवंतिका घोष, प्रसिद्धी उरकुडे, दिव्या ठवकर. हिरण्य मेश्राम, प्रश्नमंजुषा स्पर्धेतील शिरीष कुमार, सुरज रावत, हर्षिता पांडे, मोहम्मद साहिल अली, अश्विनी राऊत, अपेक्षा महाकाळकर, मोहम्मद हाजी रजा, विशाल पांडे, महेश दुर्गम, अतुल चव्हाण, ताहाउद्दीन यासर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.