लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेना व भाजपचे नेते ज्याप्रमाणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. त्यावरून आगामी निवडणुकीत ही युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही युती होणारच, असे स्पष्ट सूतोवाच शनिवारी नागपुरात केले.मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी येथे एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्हाला युती करायची आहे. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले तर त्यांनीही तसे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे ही युती होईलच. भाजप-शिवसेना संबंधाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे, असा नेहमी आरोप होतो; पण ते खरे नाही, तर शिवसेनेचेही भाजपवर तेवढेच प्रेम आहे. फक्त आम्ही प्रेम जाहीरपणे व्यक्त करतो, तर ते आमच्यावर लपून प्रेम करतात, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.गोसेखुर्द प्रकल्पातील महत्त्वाची कामे २०१९ पर्यंत पूर्ण होतील, असा दावा पुन्हा त्यांनी केला. रेतीमाफियेंविरुद्ध शासनाने कडक धोरण अवलंबिले असून, एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.औरंगाबाद नामकरणाचा प्रस्ताव जुनाचऔरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा प्रस्ताव हा जुनाच आहे. युती सरकारच्या काळातच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात नवीन काहीही करायचे नाही,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.भाजपशी युती न करणारे प्रकाश आंबेडकर एकमेव नेतेभारिपचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांच्याशी युतीबाबत विचारणा केली असता प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी आजवर कधीही भाजपशी युती केली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपविरुद्ध अनेक जण बोलतात, पण त्यांनी कधी ना कधी भाजपशी युती केलेली आहे. परंतु प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेते आहेत ज्यांनी आजवर कधीही भाजपशी युती केली नाही. एमआयएमशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही जाहीरपणे तर शिवसेना लपून प्रेम करते : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 8:14 PM
शिवसेना व भाजपचे नेते ज्याप्रमाणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. त्यावरून आगामी निवडणुकीत ही युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही युती होणारच, असे स्पष्ट सूतोवाच शनिवारी नागपुरात केले.
ठळक मुद्देभाजप-शिवसेना युती होणार