संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू - मल्लिकार्जुन खरगे
By कमलेश वानखेडे | Published: April 14, 2024 04:49 PM2024-04-14T16:49:50+5:302024-04-14T16:51:23+5:30
खरगे यांनी रविवारी नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले.
नागपूर: बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे देशातील गरीब लोकांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळेल. संविधान वाचवण्यासाठी आम्हीं लढत आहोत आणि लढत राहू, असा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. खरगे यांनी रविवारी नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले.
दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बौद्ध स्तूपातील डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला नमन केले. तसेच तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
यावेळी खरगे म्हणाले, मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीच दर्शन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे आलोय. ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले आहे. त्याच वाटेवर सर्व लोकानी चालावे हीच आमची अपेक्षा आहे.