कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. स्थानिक युनिट म्हणूनच आम्ही विचार करू. अजित पवार यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. जेथे शक्य असेल तेथे आम्ही महायुती म्हणून समोर जाऊ, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नागपुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पंधरा हजार गावांमध्ये स्वामित्व योजनेचे कार्ड वाटप होणार आहे. स्वामित्व योजनेतून गावठाण, वाड्यापाड्या, धनगरवाड्यांना, आदिवासीना घरांचं स्वामित्व मिळणार आहे. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. स्वामित्व कार्ड आणून विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी मोठा पाऊल उचलण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.मेळगातमधील घटनेवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मेळघाटमध्ये जादूटोणाच्या संशयावरून आदिवासी महिलेचा छळ करण्यात आला. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून त्यावर चर्चा करणार आहे. सरकारने कारवाई केली आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी काम करणार आहोत.
विरोधकांना टीका करण्याचेच कामविरोधकांना टीका करण्याचेच काम आहे. अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्र मजबूत केला नाही. मला माहित आहे की मुख्यमंत्री डाओस ला जात आहेत तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात गुंतवणूक आणणारे राज्य ठरेल.