शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

गुणवंतांवर पदकांचा वर्षाव

By admin | Published: September 26, 2014 1:17 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत गुणवंत

शैक्षणिक-औद्योगिक विकास सोबत व्हावा : प्रियंका बेरत्रमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात १७ पदके प्राप्त करणारी प्रियंका बेरत्रम व १५ पदके प्राप्त करणारी खुशबू दिलीप छाजेड यांचा समावेश आहे. अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमातून हे यश मिळविल्याचे मत दोघींनीही व्यक्त केले आहे.शुक्रवारचा दिवस प्रियंका विक्टर बेरत्रम हिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभात तिला १७ पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. एसएफएस महाविद्यालयातून बी.एसस्सी.चे शिक्षण पूर्ण करणारी प्रियंका गणितामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ‘लोकमत’सोबत बोलताना प्रियंकाने विद्यापीठाच्या शैक्षणिक स्तराबाबत आपले मत व्यक्त केले व एकूणच प्रणालीमध्ये तत्काळ सुधारणेची आवश्यकता का आहे याचादेखील खुलासा केला.विद्यापीठातील विद्यार्थी देशातील उत्कृष्ट विद्यापीठांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत अडचण आहे. शिक्षणाच्या स्तराचा ज्यावेळी मुद्दा येतो, तेव्हा आजदेखील विद्यार्थी योग्य प्रणाली, अनुभवी शिक्षक व इतर आवश्यक सुविधांच्या कमतरतेचा सामना करत असल्याचे दिसून येते. जर अनुकूल शैक्षणिक वातावरण मिळाले तरच विद्यार्थी आपल्या क्षमतांचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू शकतात, असे मत प्रियंकाने व्यक्त केले.इतक्या साऱ्या अडचणींचा सामना करीत प्रियंकाने यश कसे मिळविले, असा प्रश्न विचारला असता एकाग्रता व दृढनिश्चयामुळे मार्ग सोपा होता असे अतिशय साधेपणाने तिने उत्तर दिले. परीक्षांसाठी तयारी करत असताना प्रियंकाने स्वत:चा वेगळा मार्ग निवडला होता. ंपाठ्यपुस्तकातील माहितीपासून मी कधीच संतुष्ट होत नव्हती. जास्तीत जास्त पुस्तकांची मदत घेऊन आणखी सखोल उत्तर शोधते. उत्तर देताना सुस्पष्ट विचार आणि योग्य प्रकारे खुलासा करण्याचा प्रयत्न असायला हवा. ज्या नोट्सवर माझे सहपाठी निर्भर रहायचे, मी कधीच त्यांचा आधार घेतला नाही असे प्रियंका हिने सांगितले. नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधीबाबत प्रश्न केला असता तिने परखडपणे आपले मत व्यक्त केले. विद्यार्थी याबाबत अनेकदा अंधारात राहतात. त्यामुळे ते एक तर बेरोजगार राहतात किंवा अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करण्यास तयार होतात. मिहानसारख्या प्रकल्पांमुळे आपल्या क्षेत्रात वेगाने विकास होण्याची शक्यता आहे. औद्योगिक व शैक्षणिक विकास सोबत सोबत व्हायला हवा, अशी अपेक्षा प्रियंकाने व्यक्त केली. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रियंकाला ‘नेट-सेट’ परीक्षा देऊन प्राध्यापक व्हायचे आहे. माझे असे ठाम मत आहे की प्रत्येकाला नेहमी काही ना काही नवीन करत रहायला हवे. नेहमी नवनवीन माहिती मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे मी पदव्युत्तर शिक्षणानंतर संशोधनदेखील करू शकते, असे प्रियंका हिने सांगितले.कष्टातून मिळाला यशाचा मार्ग : खुशबू छाजेडमाजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान होणार असल्याने विधी अभ्यासक्रमातील यशाबद्दल १५ पदके व पुरस्कार मिळविणारी खुशबू दिलीप छाजेड प्रचंड उत्साहात आहे. विशेषत: हा सन्मान विद्यापीठाच्या ऐतिहासिक १०० व्या दीक्षांत समारंभात मिळणार असल्यामुळे तर दुग्धशर्करा योगच आला आहे. प्रचंड मेहनत व दिवसरात्र केलेल्या अभ्यासातून तिने हा सन्मान प्राप्त केला आहे. विधीच्या ५ वर्षीय अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयात तिला पदक मिळणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान वागणूक व न्याय मिळाला पाहिजे, या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन खुशबूने सिव्हील सर्व्हिसेस ऐवजी कायद्याच्या अभ्यासाला प्राधान्य दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे खुशबू हिने सांगितले. कायद्याचा अभ्यास करताना दिवसरात्र मेहनत केली. अगदी ‘सोशल लाईफ’चादेखील त्याग केला. महाविद्यालयात १०० टक्के उपस्थिती होती. अनेकदा तर वर्गात केवळ तिच उपस्थित असायची. तरीदेखील शिक्षक तिला शिकवायचे. तिच्या शिक्षिका आरती कलावत यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले व या यशात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे खुशबू सांगते. २०१२ मध्ये जी.एच.रायसोनी लॉ स्कूल येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासासाठी खुशबू युनायटेड किंगडम येथील मॅन्चेस्टर येथे गेली. तेथे तिने ‘एमएलएम’ची (इंटरनॅशनल बिझनेस अ‍ॅन्ड कमर्शिअल लॉ) पदवी मिळवली. या विद्यापीठाला तेथील सर्वात मोठे विद्यापीठ मानण्यात येते. विशेष म्हणजे तेथेदेखील तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उपराजधानीचे नाव मोठे केले आहे. जगातील निरनिराळ्या देशांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना खुशबू हिने ‘एमएलएम’दरम्यान प्रभावी संशोधन करुन ‘इंटरनॅशनल बेस्ट रिसर्चर’चा पुरस्कारदेखील मिळविला. ‘लोकमत’सोबत बोलताना खुशबूने आपल्या भावना व्यक्त केल्या. खुशबूला गायन व पाककलेत रुची आहे. प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड व सोनाली राठोड यांच्याकडून तिने गायनकलेचे धडे घेतले आहेत. बँकॉक व अन्य ठिकाणी तिने गायन सादर केले आहे. राठोड यांचे संगीत प्रेरणा देते. मला लिहिण्याचीदेखील आवड आहे असे खुशबूने सांगितले. ‘लोकमत टाइम्स’सोबत ‘फ्री लान्स पत्रकार’ म्हणूनदेखील ती काही काळ जुळली होती. भविष्यात मला एक यशस्वी ‘सॉलिसिटर’ होऊन कॉर्पोरेट जगताचा हिस्सा व्हायचे आहे. सध्या खुशबू मुंबईतील एका प्रतिष्ठित कायदा संस्थेसोबत काम करते आहे. यशाचे श्रेय तिने पालक, नातेवाईक, मित्र, रायसोनी महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य व चेअरमन यांना दिले आहे. (प्रतिनिधी)