नागपूर : राज्यातील अनेक भागात अचानक वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात आज सकाळी पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार 3.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यातही तुरळक पाऊस झाला आहे. ग्रामीण माझ्यापेक्षा नागपूर शहरात अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे.
ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून तापमानही खालावले आहे. सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार नागपुरात 36.8 तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातही वातावरण बदलले असून आकाश ढगाळलेले आहे. वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून 19 तारखेचा वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून अचानक वातावरण फिरल्याचं पाहायला मिळत आहे. वातावरणतातील हा बदल पाऊस घेऊन येतो की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.