लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अॅप’ बंद केल्याची माहिती आहे.परिवहन विभागाने राज्यात कुठेही ‘वेबबेस्ड’ किंवा तत्सम प्रकार ‘टू व्हीलर टॅक्सीज’ वरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही. असे असताना, शहरात मागील महिन्यापासून एका कंपनीने ‘अॅप’च्या मदतीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली. विशेषत: या ‘टॅक्सीज’ नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक, बर्डी व बसस्थानकावर सुरू होती. काही दिवसात या व्यवसायाने गती पकडली होती. विशेष म्हणजे, याची माहिती आरटीओ कार्यालयांना असूनही कारवाई होत नव्हती. या विरोधात बुधवारी विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर शिष्टमंडळासह शहर आरटीओ कार्यालयात धडकले. प्रवासी वाहतूक करताना परमिटची गरज असताना व ‘टू व्हीलर टॅक्सीज’ बाबात परिवहन विभागाने राज्यात कुणालाही परवानगी दिली नसताना शहरात ही प्रणाली का सुरू आहे, असा प्रश्न केला. सोबतच १५ दिवसांचा अल्टिमेटम देऊन दोषीवर कारवाई करण्याची मागणी करीत आरटीओ जाम करण्याचा इशाराही दिला. अखेर याला गंभीरतेने घेत आरटीओ शहर कार्यालयाने वायुपथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार ‘रॅपिडो अॅप’च्या ‘एमएच३१ बीझेड ४१६२, एमएच३१ डीएच ४३६५, जेके १० यु ३४५०, एमएच ४९ वाय २०६८ व एमएच ३१ बीक्यू ३०८९ या दुचाकींवर अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची कारवाई करीत वाहने जप्त केली.कारवाईपूर्वीच अॅप झाले बंदसूत्रानूसार, शहरात ५० वर दुचाकी ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’ म्हणून धावत होत्या. विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी या दुचाकीचा फायदा होत असल्याने थोड्याच दिवसात मागणीत वाढ झाली होती. परंतु गुरुवारी कारवाईला सुरुवात होऊन पाच दुचाकी जप्त होताच ‘रॅपिडो अॅप’ बंद करण्यात आले. वायुपथकातील मोटार वाहन निरीक्षकांनी या ‘अॅप’वरून दुचाकी बुक करून जप्तीची कारवाई केली. अनधिकृत म्हणूनच कारवाईकोणत्याही ‘वेबबेस्ड’ किंवा तस्सम प्रकार ‘टू व्हीलर टॅक्सीज’वरुन प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुठेच परवानगी देण्यात आलेली नाही. या विषयी तक्रार येताच गुरुवारी पाच ‘टू व्हीलर टॅक्सीज’वर कारवाई करण्यात आली. पुढेही ही कारवाई सुरू राहील.अतुल आदेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर आरटीओ
वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 8:03 PM
शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अॅप’ बंद केल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देआरटीओची कारवाई : पाच दुचाकी जप्त : कंपनीने ‘अॅप’ केले बंद