लाेकमत न्यूज नेटवर्क
धापेवाडा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना करीत त्यांचे नागरिकांना पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जात असले तरी कळमेश्वर तालुक्यात काेराेनाचे संक्रमण कायम आहे. कारण, ग्रामीण भागात आठवडी बाजार भरणे व खरेदीसाठी गर्दी करणे सुरूच आहे. ही गर्दी व नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली.
धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथेही काेराेनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर, धापेवाडा येथील १० काेराेना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲक्टिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली असून, त्यांच्यावर औषधाेपचारही सुरू आहे. साेबतच जिल्हा प्रशासनाने संक्रमण काळात आठवडी बाजार भरण्यावर तसेच गर्दी करण्यावर प्रतिबंध घातला आहे. नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, अशा सूचनाही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने नागरिकांना वेळावेळी देण्यात येत आहे.
असे असले तरी, धापेवाडा येथे साेमवारी सकाळी ७ वाजतापासून आठवडी बाजार भरणे, तिथे खरेदी करण्यासाठी गर्दी करणे, मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर पडणे व फिरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह अन्य बाबी सुरूच आहे. त्यामुळे इतर गावांच्या तुलनेत धापेवाडा येथे काेराेना संक्रमित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा त्यांच्या व इतरांच्या अंगलट येत असला तरी कुणीही उपाययाेजनांकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे.
....
दुकाने दिवसभर उघडीशासनाने लाॅकडाऊनची घाेषणा करीत दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ निश्चित केली आली. यातून वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. धापेवाडा येथे मात्र राेज सकाळपासून रात्रीपर्यंत सलून, रेडिमेड कपड्यांची दुकाने, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची दुकाने, स्टेशनरी, जनरल स्टाेर्स, हाॅटेल्स बिनधास्त सुरू असतात. या दुकानांसमाेर ग्राहकांची गर्दीही दिसून येते. हा प्रकार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती असूनही कुणावर कारवाई केली जात नाही. शिवाय, काेराेना रुग्णाच्या घराचा परिसर व गावाच्या सॅनिटायझेशनकडे लक्ष दिले जात नाही.
...
धापेवाडा येथील काेरेाना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना काेराेना टेस्ट करण्यासाठी व काेराेना प्रतिबंधक लसीकरण करवून घेण्यासाठी प्रेरित केले जात आहे. गावात हाेत असलेली नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी दाेन पाेलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
- सुरेश डाेंगरे,
सरपंच, धापेवाडा.