एनएफआयआरने केंद्र शासनाच्या खासगीकरणाच्या निर्णयावर गंभीरपणे चिंता व्यक्त केली आहे. हा निर्णय देश आणि कर्मचारी हिताचा नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. याविरुद्ध मोठ्या प्रमाणात रॅली, तसेच निदर्शने करून विरोध दर्शविण्याचे आवाहन एनएफआयआरचे महामंत्री डॉ. एम. राघवैया यांनी केले आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय कर्मचारी, तसेच गरिबांच्या विरोधात आहे. या निर्णयामुळे देशातील नागरिकांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. रेल्वेने देशातील २.३० कोटी प्रवासी दररोज प्रवास करतात. रेल्वेने कोरोनाच्या काळात १२३३ मिलियन टन माल वाहतूक करून आपले कर्तव्य बजावले. आतापर्यंत ज्या देशात रेल्वेचे खासगीकरण झाले त्या देशात वाईट अनुभव आला आहे. असे असताना केंद्र शासन रेल्वेचे खासगीकरण करीत असल्यामुळे संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे या विरोधात संघर्ष करण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनच्या वतीने करण्यात आले आहे.
..............