लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर आणि मडगाव दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२३७ नागपूर-मडगाव (गाेवा) एसी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २० फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान नागपूरवरून प्रत्येक शनिवारी दुपारी ३.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.४० वाजता मडगावला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२३८ मडगाव-नागपूर एसी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २१ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान प्रत्येक रविवारी सायंकाळी ७.४० वाजता मडगाववरून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी वर्धा, बडनेरा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी येथे थांबेल. या गाडीत १३ एसी थ्री टायर कोच राहतील.