शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

संघाच्या ‘लाईव्ह’ पुढाकाराचे सर्वस्तरांतून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:17 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्लीत आयोजित ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तीन दिवस भूमिका मांडली. बुधवारी अखेरच्या दिवशी आयोजित प्रश्नोत्तरांच्या सत्राचे नागपुरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. सेवासदन हायस्कूलच्या सभागृहात सरसंघचालकांचे विचार ऐकण्यासाठी विविध विचारधारांचे लोक एकत्र आले होते. संघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रथमच अशाप्रकारचे आयोजन झाले व यामुळे अनेक गोष्टींबाबत खुलासा झाला, असा या मंडळींचा सूर होता.

ठळक मुद्देविचार ऐकण्यासाठी विविध विचारधारांचे लोक एकत्र : सरसंघचालकांच्या भाषणातून बरेच मुद्दे स्पष्ट झाल्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्लीत आयोजित ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तीन दिवस भूमिका मांडली. बुधवारी अखेरच्या दिवशी आयोजित प्रश्नोत्तरांच्या सत्राचे नागपुरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. सेवासदन हायस्कूलच्या सभागृहात सरसंघचालकांचे विचार ऐकण्यासाठी विविध विचारधारांचे लोक एकत्र आले होते. संघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रथमच अशाप्रकारचे आयोजन झाले व यामुळे अनेक गोष्टींबाबत खुलासा झाला, असा या मंडळींचा सूर होता.विश्वसंवाद केंद्र व भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सरसंघचालकांचे विचार ऐकण्यासाठी संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत इतर विचारधारांचे व विविध क्षेत्रांतील लोकदेखील उपस्थित होते. सरसंघचालकांनी संघकार्य, आरक्षण, गोरक्षा, सामाजिक समरसता, राजकारण, शिक्षणपद्धती, इतर धर्मातील चांगल्या गोष्टी, संस्कृती संवर्धन याबाबत भाष्य केले. एरवी आमच्या मनात संघाबाबत अनेक गैरसमज होते. संघ केवळ ठराविक चौकटीत काम करणारी व एकाच विचारधारेवर चालणारी संघटना आहे, असे आम्हाला वाटायचे. विविध माध्यमातून असे चित्रदेखील उभे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात संघाची कार्यपद्धती व त्यांची भूमिका याबाबतचे गैरसमज आज दूर झाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. बऱ्याच जणांनी वैयक्तिक कारणांमुळे आपले नाव प्रकाशित करू नये अशी प्रसारमाध्यमांना विनंती केली. याव्यतिरिक्त कार्यक्रमाला ‘आरपीआय’ गवई गटाचे नेते प्रकाश कुंभे, सेंट्रल बँक ‘एससी एसटी’ असोसिएशनचे नेते दादा उके, स्टेट बँक ‘एससी एसटी युनियन’चे नेते व्रजबोधी मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, धर्मपाल मेश्राम, वाल्मिकी समाजाचे नेते सुंदरलाल ताकभोरे, कशोर बिरला, राज मेहर हेदेखील यावेळी उपस्थित होते.संघाने सर्वांपर्यंत पोहोचावेसाधारण: संघात कार्य करणारे लोक हे आपल्या कार्याबाबत फारशी वाच्यता करत नाही. संघाने प्रसिद्धीपराड्.मुख भूमिका घेतल्याने समाजातील गैरसमज वाढत गेले. त्यामुळे संघाने आपले कार्य जास्तीत जास्त प्रमाणात समाजापर्यंत पोहोचविले तर गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल, असा संघ परिवाराव्यतिरिक्त उपस्थित मान्यवरांचा सूर होता.संघ परिवारातदेखील उत्सुकतादेशाला पडलेल्या विविध प्रश्नांना सरसंघचालक नेमके कसे उत्तर देतात हे ऐकण्याची संघ परिवारातील संघटनांच्या प्रतिनिधींनादेखील उत्सुकता होती. विशेष म्हणजे नागपुरात संघ मुख्यालय असून विजयादशमीसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम येथे होतात. येथील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण विविध ठिकाणी आयोजित करण्यात येते. मात्र नवी दिल्लीतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहणे हा नागपूरकरांसाठी एक नवीनच अनुभव होता.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ