मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नववर्ष स्वागत समिती तसेच मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला आदिशक्ती माता मंदिर येथून महिलांची स्कूटर रॅली काढण्यात आली. नागपूरच्या प्रसिद्ध शेफ अपर्णा कोलारकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅली गणेशनगरमार्गे गजानन चौक, रेशीमबाग मार्गाने जाऊन हेडगेवार स्मारकाच्या समोरील बगीच्यात रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठन झाले. सहभागी महिलांना अल्पोपहार देण्यात आला.सण कुठलाही असो तो निखळ आनंद देतो. परंतु माणसानेच त्याला धर्माच्या बंधनात अडकविले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात हरविलेले आनंदाचे क्षण जर सणांच्या माध्यमातून लुटता येत असतील तर काय वाईट आहे. याच भावनेतून हिंदू असो वा मुस्लीम धर्माचे सण साजरे करून मानवतेची भावना मोहम्मद सलीम हे समाजात रुजवीत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याला आपल्या दारात गुढी उभारून ते एकतेचा संदेश देतातमो. सलीम तसे हरफनमौला व्यक्तिमत्त्व आहे. मोहम्मद रफींचे निस्सीम चाहते असलेले सलीम उत्कृष्ट गायकसुद्धा आहेत. त्यांच्यामधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना संगीतातूनही दिसून येते. ते गुढीपाडवा पहाट, दिवाळी पहाट, भक्तिगीतांचे कार्यक्रम, सामाजिक संदेश देणारा ‘परंपरा महाराष्ट्राची ईद,दिवाळी सर्वांची’ या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यांचे वडील हे पीडब्ल्यूडीमध्ये खानसामा होते, सोबतच बीएएमएस डॉक्टरसुद्धा. गावात वडिलांची चांगली प्रतिष्ठा होती. सर्वच समाज आणि धर्मातील लोक त्यांना मानायचे. त्यामुळे सर्व हिंदूंचे सण ते घरीच साजरे करायचे. या सणाला त्यांच्या घरी जलसासारखे रूप यायचे. मो. सलीम हे महालेखाकार कार्यालयात कार्यरत आहेत. सदर मंगळवारी बाजार परिसरात ते राहतात. वडिलांनी जपलेली ही परंपरा त्यांचे कुटुंबीयही टिकवून आहे.रविवारी सकाळी अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या घरी गुढी उभारली. तिची पूजा केली. साधारणत: हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला जे पदार्थ बनवितात, ते पदार्थ बनवून पत्नी व मुलींसह सण साजरा केला. सलीम यांनी जपलेली ही परंपरा बघून अनेक जण त्यांचे कौतुक करतात. कॉलनीमध्ये तर ते चांगलेच परिचित आहेत. काही समाजबांधवांनी त्यांना टोकले तरी त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांच्या मते गुढी ही कुठल्याही धर्माची नसून भारतीयांची आहे. मी महाराष्ट्रात जन्मल्यामुळे येथील संस्कृती मी जपतोय.
सणांचा उद्देश पूर्ण करतोयसरकार सणांना सुटी देताना जात-धर्म बघत नाही. दिवाळीला जशी सर्वांना सुटी मिळते तशी ईदलासुद्धा. ज्या उद्देशाने सरकारने सुटी घोषित केली आहे तो उद्देश प्रत्येकाने पूर्ण करावा. काय हरकत आहे, हिंदू बांधवांनी ईद साजरी केली किंवा मुस्लीम बांधवांनी दिवाळी . सण साजरा करण्यामागचा उद्देशच एकत्र येणे, आनंद लुटणे हा आहे आणि मी तेच करतोय.-मो. सलीम