शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
3
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
4
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
5
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
6
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
7
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
8
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
9
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
10
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
11
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
12
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
13
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
14
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
15
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
16
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
17
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

वेंकय्या नायडूंच्या उमेदवारीचे संघ वर्तुळातून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:05 AM

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा झाल्याने संघ वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

संघ स्वयंसेवक रिंगणात : संघश्रेष्ठींनी दाखविला होता हिरवा कंदील लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा झाल्याने संघ वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. संघ विचारसरणी जवळून जाणणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे संघ स्वयंसेवकांनी स्वागत केले आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी संघाने कुणाचेही नाव सुचविले नव्हते. मात्र सखोल मंथनानंतर भाजपाने नायडू यांचे नाव संघश्रेष्ठींसमोर मांडले व त्याला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांना रालोआने उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चा रंगली होती. उपराष्ट्रपतिपदासाठी संघातर्फे कुणाचेही नाव देण्यात आले नव्हते. मात्र संबंधित व्यक्ती प्रामाणिक, सर्वमान्य, चांगल्या प्रतिमेची व संघ विचारांना जाणणारी हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. व्यापक विचारविनिमयानंतर भाजपातर्फे वेंकय्या नायडू यांचे नाव संघ पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. पक्षाने सुचवलेल्या नावाला संघाने अजिबात हरकत घेतली नाही व त्यांच्या उमेदवारीला समर्थन दिले, अशी माहिती संघातील सूत्रांनी दिली.संघभूमीचे संस्कारवेंकय्या नायडू हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. अगोदर केवळ शाखेत खेळण्याच्या उद्देशाने ते संघात आले. मात्र त्यानंतर संघ विचारधारेचे त्यांच्यावर संस्कार झाले व राजकारणात ते प्रगती करत गेले. अगदी संसदेत भाषण देत असतानादेखील त्यांनी संघ स्वयंसेवक असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते. नायडू यांचा नागपूरशी जवळचा संबंध राहिला आहे. स्वयंसेवक असताना, भाजपा अध्यक्ष झाल्यावर व आता केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी अनेकदा नागपूर तसेच संघ मुख्यालयाला भेट दिली आहे. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात त्यांची मौलिक भूमिका होती. पेंच टप्पा चार शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगीदेखील ते आवर्जून उपस्थित होते.‘सोशल मीडिया’वर आनंददरम्यान, संघ स्वयंसेवक तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी वेंकय्या नायडू यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. ‘सोशल मीडिया’वर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.