शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

सुस्थितीतील पालक निर्वाह भत्ता मिळण्यास अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:18 AM

नागपूर : आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या पालकांना निर्वाह भत्ता दिला जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ...

नागपूर : आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या पालकांना निर्वाह भत्ता दिला जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी एका प्रकरणात दिला.

आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियमांतर्गत मुलाकडून १० हजार रुपये निर्वाह भत्ता मिळावा, याकरिता चंद्रपूर येथील देवराव व माया बोबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पालकांची एकंदरीत आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यांना निर्वाह भत्ता दिला जाऊ शकत नसल्याचे सांगून याचिका फेटाळून लावली. सुरुवातीला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ४ डिसेंबर २०१८ रोजी आणि त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट २०१९ रोजी दिलासा नाकारल्यामुळे पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

देवराव व माया बोबडे यांना दोन मुले व दोन मुली आहेत. मुलींचे लग्न झाले आहे. देवराव वीज कंपनीत नोकरी करीत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मोठी रक्कम मिळाली. त्यांच्याकडे मौजा सागरा येथे १.३८ हे.आर. जमीन असून, तेथून दरवर्षी ४ ते ५ लाख रुपयाचे उत्पन्न होते. तुकुम येथे दोन मजली घर आहे. तेथून १५ हजार रुपये भाडे मिळते. सदर पालक सध्या संजय नामक मुलाकडे राहत असून ते वीज कंपनीत नोकरीला आहे. त्यांना २५ ते ३० हजार रुपये वेतन आहे. असे असताना पालकांना प्रमोद नामक मुलाकडून निर्वाह भत्ता हवा होता. परंतु, त्यांना निर्वाह भत्त्यासाठी पात्रता सिद्ध करता आली नाही.

----------------

आंतरजातीय विवाहामुळे नाराज

प्रमोद यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. तसेच, ते जमीन व घरात वाटा मागत आहेत. त्यामुळे पालक नाराज आहेत. प्रमोद सरकारी नोकर असून, ते पुणे येथे राहत आहेत. ते पालकांना पुणे येथे नेऊन त्यांचे पालनपोषण करण्यास तयार आहेत. परंतु, पालक त्यांच्याकडे जाण्यास तयार नाहीत. हे मुद्देही याचिका फेटाळताना विचारात घेण्यात आले. प्रमोदतर्फे ॲड. शिल्पा गिरटकर यांनी कामकाज पाहिले.