लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एम्प्रेस सिटीच्या परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चंद्रशेखर बारापात्रे (वय ४०), अजय मारोती गारूडी (वय ४६, रा. लाडपुरा तांडापेठ) आणि दीपक महादेव गवसे (वय ४५, रा. सुगतनगर, जरीपटका) अशी मृताची नावे आहेत. विहिरीतील विषारी वायूनेच त्यांचा गुदरमून मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.एम्प्रेस सिटी परिसरात एकाबाजुला एक अशा बहुमजली ईमारती आहेत. या ईमारतीत बेसमेंटमध्ये पाण्यासाठी विहीरी खोदण्यात आल्या आहेत. गांधीसागर तलावाच्या बाजुने या ईमारतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. त्यातीलच एक विहिर अनेक दिवसांपासून वापरात नसल्याने तिची साफसफाई करण्यासाठी दुपारी बारापात्रे, गारोडे आणि गवते तसेच अन्य काहींना बोलवून घेण्यात आले. दुपारी ४ च्या सुमारास मजुरांपैकी एक जण दोराने ईलेक्ट्रीक मोटर काढण्यासाठी उतरला. मात्र, गुदरमल्याने तो विहिरीत पडला. विहिर १२ फुट खोल असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खाली पडलेल्याच्या मदतीला दुसरा मजूर उतरला. मात्र, त्यालाही गुदमरल्यासारखे झाल्याने तो अर्ध्यावरच तडफडू लागला आणि तोसुद्धा पाण्यात पडला. आपले दोन मित्र विहिरीत पडल्याने वर उभे असलेल्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चौकीदारासह बाजुची मंडळी धावून आली. त्यांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना फोन करून माहिती कळवली. दुसरीकडे आपले सहकारी तडफडत असल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या तिस-या मजुराने त्यांना वर काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचा धोका पत्करला. तो विहिरीत उतरला अन् तोदेखिल पाण्यात पडून तडफडू लागला. या प्रकारामुळे विहिरीत विषारी वायू असल्याचे लक्षात आल्याने वर उभे असलेल्यांनी आरडाओरड केली.दरम्यान, अग्निशमन दल आणि गणेशपेठ पोलिसांचे पथक तेथे पोहचले. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतदेह मेयोत रवाना करण्यात आले.हलगर्जीपणामुळे घडली घटनाही दुर्घटना देखरेखीत हलगर्जीपणा केल्यामुळेच घडल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाने बांधला आहे. तर, अवघ्या १२ फुटाच्या विहीरीत एवढ्या तीव्रतेचा विषारी वायू निर्माण झाल्याने अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनीही लोकमतशी बोलताना आश्चर्य व्यक्त केले. ब-याच दिवसांपासून विहिरीची साफसफाई झाली नाही. आजुबाजुच्या सिवरेज लाईन लिकेज झाल्या असाव्या, त्यातील वायू विहिरीत जमा झाल्याने विहिरीतील विषारी वायूची तीव्रता वाढली असावी, असा अंदाजही उचके यांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी रात्रीपर्यंत अनेकांचे बयाण नोंदवून घेतले. मृत तीनही व्यक्ती अत्यंत गरिब परिवाराचे प्रमूख होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आणि या दुर्घटनेला ज्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांकडून केली जात होती.दीपक होता कुटुंबाचा आधारसुगतनगरातील दीपक गवसे गेल्या काही वर्षांपासून एम्प्रेस सिटीच्या पाणी पुरवठा विभागात ईलेक्ट्रीशियन म्हणून देखभालीचे काम करीत होता. त्याच्या परिवारात पत्नी, १५ वर्षांची मुलगी निधी आणि १४ वर्षांचा मुलगा पलाश आहे. तो आठवीत असून, निधीने नुकतीच दहावीची परिक्षा दिली आहे. कुटुंबात तो एकमात्र कमावता व्यक्ती होता. तोच अशा पद्धतीने गेल्यामुळे आता या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे.
नागपुरात विहिरीने घेतले तीन मजुरांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:05 PM
एम्प्रेस सिटीच्या परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देविषारी वायुमुळे गुदमरल्याचा अंदाजएम्प्रेस सिटीच्या परिसरात दुर्घटना