भीक मागण्यासाठी होतोय वापर : शासकीय योजना केवळ कागदावरचजगदीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीक मागण्यासाठी चिमुकल्यांना यातना देण्यात येत आहेत. शहराच्या अनेक प्रमुख चौकात हे दृश्य पाहून कोणाच्याही मनाला दु:ख होईल. परंतु पोलीस, मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि शासकीय कार्यालयांना त्याची पर्वा नाही. काही दिवसांपूर्वी व्हेरायटी चौकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोन दिवस अत्याचार केल्याचे प्रकरण घडले होते.रविवारी देशभरात मदर्स डे साजरा करण्यात आला. आई करुणेचा सागर मानण्यात येते. ती मुलाला प्रत्येक दु:ख, संकटातून वाचविते. ‘लोकमत’ने पंचशील चौकात पाहिलेले दृश्य डोळ्यात पाणी आणणारे आहे. चार ते पाच वर्षांची एक चिमुकली चौकात भीक मागत होती. पायात चप्पल नसल्यामुळे तिला उभे राहणेही कठीण होत होते. ती भीक मागण्यासाठी वाहनचालकांचे पाय पकडून याचना करीत होती. कोणी दोन-चार रुपये देत होते तर कोणी दुर्लक्ष करून निघून जात होते.याचे मुख्य सूत्रधार या मुलांचे पालक असून मुलांकडून भीक मागवून ते आपले व्यसन पूर्ण करतात. शहरातील रस्त्यांवर भीक मागणाऱ्या मुलांची संख्या शेकडो आहे. रस्त्यावर मुलांना सोडून एक जण त्यांच्यावर नजर ठेवतो तर इतर सदस्य चोरी करण्यासाठी सावज शोधतात. कळत्या मुलांना गोळा झालेल्या पैशातून वाटा देण्यात येतो. शहरात ग्रामीण भागातून मुलांना भीक मागण्यासाठी आणण्यात येते. ही मुले दिवसभर सीताबर्डी परिसरात भीक मागतात. पोलिसांकडून पकडल्या जाण्याच्या भीतीने मुलांजवळ मोबाईल देण्यात येत नाही. त्यांना पोलिसांपासून बचाव कसा करावा, याचीही माहिती देण्यात येते. शहरात अनेक ठिकाणी भीक मागणाऱ्यांचे अड्डे आहेत. पोलिसांना त्याची माहिती असूनही कारवाई करण्यात येत नाही. नुकतेच गुन्हेगारांनी व्हेरायटी चौकातून अपहरण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यांनी या अल्पवयीन मुलीच्या वयाच्या तिघींचे शोषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या त्यांच्या तावडीत न सापडल्याने वाचल्या. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर खळबळ उडाली. यात सीताबर्डी पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’‘लोकमत’ने सीताबर्डी परिसरातील गुन्हेगारांद्वारे मुलीचे शोषण झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर २६ एप्रिलला बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने सीताबर्डी, धंतोली परिसरात मोहीम राबवून आठ अल्पवयीन भीक मागणाऱ्यांना पकडले होते. त्यांच्या कुटुंबातील दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. परंतु कारवाईच्या चार दिवसानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
चिमुकल्यांच्या भविष्याचे काय?
By admin | Published: May 16, 2017 2:07 AM