अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 5, 2023 05:36 PM2023-10-05T17:36:04+5:302023-10-05T17:36:54+5:30

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती

What has delayed the development of Amravati-Shelad Road? High Court's inquiry to Highways Authority | अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

googlenewsNext

नागपूर : अमरावती ते शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला केली व यावर येत्या १९ ऑक्टोबरपर्यंत विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात ॲड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय पृथ्वीराज चव्हाण व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणने प्रतिज्ञापत्र दाखल करून अमरावती ते कुरणखेड टप्प्याचे ८९ टक्के तर, कुरणखेड ते शेलाड टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचे व उर्वरित काम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले.

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. करिता, न्यायालयाने हे निर्देश दिले. नागपूर ते अमरावती आणि अमरावती-चिखली महामार्गावरील शेलाड ते चिखलीपर्यंतच्या टप्प्याचे विकास काम पूर्ण झाले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा तर, प्राधिकरणतर्फे ॲड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: What has delayed the development of Amravati-Shelad Road? High Court's inquiry to Highways Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.