लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागाच्यावतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदतनिसांना २,५०० मानधन देण्यात येते. या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात सहभागी होणाºया अंगणवाडी कर्मचाºयांवर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र दिले असून, या पत्राची संविधान चौकात अंगणवाडी सेविकांनी होळी केली. सरकारने माधनधनात वाढ करावी अन्यथा खर्ची रिकामी करावी असा इशारा अंगणवाडी कर्मचाºयांनी यावेळी दिला.अंगणवाडी कर्मचाºयांना तेलंगणा, दिल्ली, केरळमध्ये १० हजार मानधन देण्यात येते. परंतु महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाºयांना तुटपुंजे मानधन देण्यात येत असल्यामुळे सातत्याने मोर्चे काढल्यानंतर शासनाने महिला व बालविकास विभागाच्या अध्यक्षतेखाली २० आॅगस्ट २०१६ रोजी मानधनवाढ समिती गठित केली. समितीने अंगणवाडी कर्मचाºयांना मानधनात दुपटीने वाढ करण्याची शिफारस केली, परंतु तरीसुद्धा शासन मानधनात वाढ करण्यास टाळाटाळ करीत आहे. याशिवाय अंगणवाडी कर्मचाºयांचे मानधन चार महिने न देणे, मिळणारा अपुरा निधी वाढवून देण्यास टाळाटाळ करणे यामुळे काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.संपात सहभागी होणाºया अंगणवाडी कर्मचाºयांना शासनाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. या पत्राची अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संविधान चौकात होळी करून निषेध केला आहे. यावेळी आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, सीटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर भरणे, सल्लागार प्रमिला मर्दाने, रेखा कोहाळ, वनिता कापसे, अमिता गजभिये, चंदा मेंढे, रजनी सूर्यवंशी, प्रमिला नाईक, चंद्रशेखर शुक्ला, रूपचंद्र गद्रे, शीला जगताप यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.
मानधनात वाढ देता की जाता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:19 AM
महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागाच्यावतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदतनिसांना २,५०० मानधन देण्यात येते.
ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल : शासनाच्या पत्राची होळी