महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? नाना पटोलेंचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:36 AM2023-12-14T11:36:34+5:302023-12-14T11:37:47+5:30

निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी भाष्य केले.

What is the BJP getting by burning Maharashtra? The question of nana patole | महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? नाना पटोलेंचा सवाल 

महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? नाना पटोलेंचा सवाल 

नागपूर : महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र पेटवून भाजपला काय प्राप्त होतं आहे? समजत नाही. सरकार कसं पाप करत आहे. मंत्रीच सांगत आहेत. महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका यांनी घेतली आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

आज राज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी, परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्व समाजाचे शेतकरी आहेत. पण सरकारला जनतेचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी उत्तर देणार? ते समजत नाही. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पेटवला जात आहे. तो शांत केला पाहिजे, असे नाना पटोले.

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावर नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र बरबाद करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झाल आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसावर चर्चा संपली. मुख्यमंत्री उत्तर देतील असे कळत होते, पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही. उद्या उत्तर देणार असं कळतंय. या लोकांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली.

याचबरोबर, निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी भाष्य केले. यावेळी निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. कोणत्याची लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो. त्यावेळी तिथे पोट निवडणूक घेतली पाहिजे. पण, केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग निर्णय घेत नाही, त्यामुळे न्यायालयाने यांना फटकारले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: What is the BJP getting by burning Maharashtra? The question of nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.