शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
3
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
4
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
5
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
6
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
7
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
8
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
9
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
10
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
11
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
12
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
14
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
15
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
16
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
17
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
18
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
19
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
20
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

शेतकऱ्यांना उपयोग होत नसेल तर संशोधनाचा फायदा काय? नितीन गडकरी यांचे परखड मत 

By निशांत वानखेडे | Updated: October 28, 2023 21:01 IST

आपल्या देशातील संत्र्याची गुणवत्ता व उत्पादकता आंतरराष्ट्रीय स्तराच्या मानाने कमी आहे, त्यासाठी उपाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना रोगमुक्त, गुणवत्तापूर्ण व उत्पादकता असलेल्या संत्र्याची गरज आहे, पण ती पूर्ण होत नाही. ‘सीसीआरआय’सारखी संस्था ३०-३२ वर्षापासून या भागात संशोधन करीत आहे. मात्र त्याचा शेतकऱ्यांना उपयोगच होत नसेल तर होणारे संशोधन व संशोधन संस्थांचा फायदा काय, ते केवळ सरकारच्या आलमारीत सजविण्यासाठी होते काय, असा परखड सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.

इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या 'एशियन सीट्रस काँग्रेस २०२३ ' ला शनिवारपासून नागपुरात सुरुवात झाली. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. याप्रसंगी आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. टी.आर. शर्मा, कृषी वैज्ञानिक रिक्रुटमेंट बोर्डाचे माजी चेअरमन डॉ. सी.डी. मायी, फ्लाेरीडा विद्यापीठाचे डॉ. मायकल रॉजर, दक्षिण कोरियाचे डॉ. क्वॉन साँग व डाँग-सून किम, लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय) चे संचालक डॉ. दिलीप घोष प्रामुख्याने उपस्थित होते.

संत्रा हे विदर्भातील शेकऱ्यांसाठी एक महत्वाचे पीक असून संत्र्यावर नागपूर सोबतच देशात विविध संशोधन संस्था नवनवीन संशोधन करीत आहे. देशातील संत्रा, मोसंबी आणि लिंबू उत्पादकांची मुख्य समस्या ही उत्पादनाची गुणवत्ता असून शेतकऱ्यांना रोगविरहित, उच्च दर्जाची, भरघोस उत्पादन क्षमता असणारी लिंबूवर्गीय फळांची रोपे मिळावी यासाठी वैज्ञानिक व संशोधन संस्थांची जबाबदारी आहे. त्यासाठी जगातील कुठल्या संस्थेचे सहकार्य घ्यायचे आहे, ते वैज्ञानिकांनी ठरवावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सध्या भारताचा कृषी विकास दर केवळ १२ टक्क्यावर आहे. भारत ५ ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी शेतीत आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. बाजार उपलब्ध करणे, प्रक्रिया उद्योग वाढविणे व निर्यातीचा खर्च कमी करणे ही सरकारची जबाबदारी पण वैज्ञानिकांनी जगभरातील जगभरातील संस्थांच्या सहकार्याने निश्चित असे डाक्युमेंटेशन केले तर सरकारला धाेरण तयार करण्यास मदत होईल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

दोन कोटी कलमा उपलब्ध कराभारतात लिंबूवर्गीय फळांच्या १.७० कोटी कलमांची गरज आहे पण केवळ संशोधन संस्थांनी खाजगी नर्सरीच्या सहकार्याने केवळ २५ ते ३० लाख कलमा उपलब्ध होतात. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. याचा उल्लेख करीत नितीन गडकरी यांनी देशातील कृषी संशोधन संस्थांनी खाजगी नर्सरींसोबत भागीदारी करून वर्षात २ कोटी कलमा उपलब्ध कराव्या, असे आवाहन केले. आपल्या देशातील संत्र्याची गुणवत्ता व उत्पादकता आंतरराष्ट्रीय स्तराच्या मानाने कमी आहे, त्यासाठी उपाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अधिकाऱ्यांच्या कामगिरी आधारित मूल्यांकनाची गरजनितीन गडकरी यांनी संशोधन संस्थांच्या अधिकाऱ्यांना यावेळी खडेबोल सुनावले. हे अधिकारी सातवा, आठव्या वेतन आयोगाची मागणी करीत असतात पण त्यांच्या कार्याचा, संशोधनाचा सामान्य माणसांसाठी किती फायदा होतो, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे अशा संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक सर्वेक्षणासाठी कामगिरी आधारीत सर्वेक्षणाचीही गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी