लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ईडीच्या चौकशीत माझ्यासारख्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे सामान्यजनांची काय अवस्था होऊ शकते हे तुम्ही समजून घ्या. शेतीच्या अवजारांच्या किंमती वाढल्या, खतांमध्ये भाववाढ झाली आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.पुलवामातील लष्करी तळ उध्वस्त करण्याचा निर्णय एकट्या मोदींचा नव्हता, त्यात आम्ही सहभागी होतो. माजी संरक्षणमंत्री या नात्याने मीही त्या बैठकीत हजर होतो, मात्र त्याचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतल्याचे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानसोबत युद्ध करून बांगलादेशची निर्मिती केली. मात्र आम्ही त्याचा राजकीय फायदा कधीच घेतला नाही. भाजपाने मात्र अशा कारवायांचा फायदा उचलला. त्या बळावरच त्यांनी लोकसभेच्या न्विडणुका जिंकल्या असे ते पुढे म्हणाले.आपण कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही भेटी दिल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात एक हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती.या या सरकारने कोणते हिताचे निर्णय घेतले ते सांगावे. हे सरकार सर्वसामान्यांना संकटात लुटणारे आहे. महागाई वाढली, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, निवड सत्तेचा गैरवापर करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.पी चिदंबरम यांचा काय गुन्हा होता हे सांगावे दीड महिन्यापासून त्यांना कारागृहात डांबले आहे. कुठल्याही कर्जवाटपात माझा कसलाही संबंध नसताना माझ्यावर नोटीस बजावली. मी स्वत: त्यांच्याकडे पाहुणचाराला घेण्याची तयारी दाखवल्यावर मात्र ते घाबरले. येऊ नका अशी विनंती केली. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन मी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केलाशिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार बांधणार होते भूमिपूजन झाले पण त्यापुढे काम सरकलं नाही. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा झाली त्याला कसलाही पत्ता नाही. राजकीय फायद्यासाठी खोट्या घोषणा देण्याचे काम सरकार करीत आहे असे शरद पवार पुढे म्हणाले.
मला ईडीत अडकवण्याचा प्रयत्न तर सामान्यांची काय कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 5:50 PM