शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलिसांचा खरा चेहरा कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:32 AM

कायद्याचेच नव्हे तर सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे एकाच प्रकरणातील हे दोन चेहरे सोमवारी बघायला मिळाले. एक मदत करणारा तर दुसरा अन्याय करणारा. एक आश्वस्त करणारा तर दुसरा चीड आणणारा.

ठळक मुद्देठाण्यातील पोलिसांकडून अन्यायरस्त्यावरच्या पोलिसाकडून मदत

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपेक्षा नसताना एका कारचालकाला रस्त्यावरच्या पोलिसाने स्वत:चा जीव धोक्यात घालून गुंडांच्या तावडीतून वाचविले. त्याला रुग्णालयात पोहचविले. हे करताना तो गुंडांच्या हल्ल्यात स्वत:ही जखमी झाला. तर, या गुंडांना धडा शिकविण्याची जबाबदारी असलेल्या ठाण्यातील पोलिसांनी जखमींच्या तक्रारीला बेदखल करीत प्रकरण गुंडाळले. कायद्याचेच नव्हे तर सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे एकाच प्रकरणातील हे दोन चेहरे सोमवारी बघायला मिळाले. एक मदत करणारा तर दुसरा अन्याय करणारा. एक आश्वस्त करणारा तर दुसरा चीड आणणारा. त्यामुळे शहर पोलिसांचा खरा चेहरा कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.घटना रविवारी रात्री ९.४५ ची आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्कर्षनगर आहे. या भागात एका भरधाव आयशर ट्रक (एमएच ३१/ डीएस २०१२) चालकाने इनोव्हाला जोरदार धडक मारली. ट्रकचालक टुन्न होता आणि या ट्रकमध्ये १५ ते २० जण बसून होते. त्यातीलही अनेक जण टुन्न होते. धडक मारल्यामुळे इनोव्हा चालकाने ट्रकचालकाला ‘दिखता नहीं क्या...‘ असा स्वाभाविक प्रश्न केला. ट्रकचालकाने त्याला ‘दिखाता हूं‘ म्हणत खाली उडी घेतली. त्याच्यासोबतच ट्रकमधून ७ ते १० जण उतरले. त्यांनी इनोव्हाचालकाला कारमधून खाली खेचून बेदम मारहाण केली. इनोव्हाच्या मागेच एक पोलीस कर्मचारी विवेक अढावू दुचाकीवर होते. कर्तव्यावरून ते घरी जात होते. इनोव्हाला धडक बसताच अढावू यांच्याही दुचाकीलाही कट लागला अन् ते खाली पडले. कारचालकाला मारहाण होत असल्याचे पाहून ते मदतीला धावले. ‘मी पोलीस आहे. त्याला मारू नका, जे काही असेल ते पोलीस ठाण्यात चला अन् तेथे सांगा’असे ते म्हणाले. मात्र, दारूच्या नशेतील गुंडांनी अढावू यांना धक्का मारून बाजूला केले आणि कारचालकाला खाली खेचून त्याच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला चढवला. त्याचा जीव धोक्यात असल्याचे पाहून अढावूंनी रॉडचे फटके आपल्या हातावर झेलले. त्यात त्यांच्या बोटाला जबर दुखापत झाली. दरम्यान, बाजूची मंडळी धावल्याने शिवीगाळ करीत आरोपी ट्रकमधून पळून गेले. जाताना त्याचे हातघड्याळही हिसकावून नेले. बेदम मारहाणीमुळे दहशतीत आलेल्या कारचालकाला अढावूंनी बाजूच्यांच्या मदतीने रुग्णालयात पोहचविले.सोमवारी सायंकाळी या प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी कारचालक गिट्टीखदान ठाण्यात पोहचला. त्याच्या विनंतीवरून अढावू साक्षीदार म्हणून ठाण्यात पोहचले. त्यांना दोन-अडीच तास बसवून ठेवल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाच्या सोयीची होईल, अशी या प्रकरणात तक्रार लिहून घेतली. मारहाण करणारे आरोपी ७ पेक्षा जास्त असताना केवळ कॅबिनमध्ये चालकासोबत असलेले तीन ते चार लिहून घेतले. घड्याळ हिसकावून नेले, हे तक्रारीत लिहून घेण्याचे टाळले. प्रकरण ‘एनसी’ (अदखलपात्र) केले.कारला धडक देऊन अपघात घडविणे, कारचालकावर प्राणघातक हल्ला करणे, त्याची हातघड्याळ हिसकावून नेणे, पोलिसाने स्वत:चा परिचय देऊनही गैरकायद्याची मंडळी जमवून त्याला मारहाण करणे, हे अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. एखाद्या वाहतूक पोलिसासोबत साधी बाचाबाची झाली तरी पोलीस ठाण्यातील मंडळी बाचाबाची करणाऱ्यावर मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे असे गंभीर गुन्हे दाखल करतात. येथे एकाला बेदम मारहाण झाली, त्याचे घड्याळ हिसकावून नेले. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलीस आहो, असे सांगूनही न जुमानता त्यांच्याही हातावर रॉडचे फटके मारले. मात्र हे सर्व करणाºया ट्रकचालक व त्याच्या साथीदारांवर साधा लूटमारीचा गुन्हाही दाखल केला नाही. गिट्टीखदान पोलिसांनी संबंधित आरोपींवर ही मेहेरबानी का दाखवली, तो स्वतंत्र तपासाचा विषय ठरला आहे. सोबतच या प्रकरणाने पोलिसांचे हे दोन चेहरेही पुढे आणले आहेत. त्यातील एक आश्वस्त करणारा तर दुसरा चीड आणणारा आहे.

टॅग्स :Policeपोलिस