लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनावर नागपूरचे वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट जुल्फेश शाह यांनी त्यांच्याशी जुळलेल्या काही आठवणी ताज्या करताना ते एक दूरदृष्टी असणारे ज्ञानसंपन्न नेते होते, अशी भावना व्यक्त केली.शाह यांनी सांगितले की, अरुण जेटली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी डिसेंबर २०१३ मध्ये नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांच्याशी भेटीचा योग आला. तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अरुण जेटली यांच्याशी भेट घडवून आणली होती. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था आणि कायद्याशी जुळलेल्या विविध मुद्यांवर जेटली यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली होती. जेटली यांचे व्हिजन आणि कायदा व आर्थिक ज्ञान दूरदृष्टी देणारे असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले होते.चर्चेदरम्यान जेटली यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आयकर प्रणाली कशा प्रकारची असावी, त्यात लोकांना काय बदल हवे आहेत, लोकांची प्रतिक्रिया काय आहे, आदी प्रश्न त्यांनी विचारले होते. या प्रश्नांवर त्यांचे विचार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. चर्चेदरम्यान जेटली यांच्याकडून अनेक बाबी शिकायला मिळाल्याचे शाह यांनी सांगितले. नवी दिल्लीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटच्या एका समारंभात जेटली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते देशाचे वित्तमंत्री होते. त्यावेळीही जेटली यांच्या भेटीची आठवण ताजी करताना शाह यांनी जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
लोकांना करात काय बदल हवा : जेटली यांचा चर्चेदरम्यान प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:41 AM
माजी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनावर नागपूरचे वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट जुल्फेश शाह यांनी त्यांच्याशी जुळलेल्या काही आठवणी ताज्या करताना ते एक दूरदृष्टी असणारे ज्ञानसंपन्न नेते होते, अशी भावना व्यक्त केली.
ठळक मुद्देसीए जुल्फेश शाह यांनी आठवण केली ताजी