राज्यस्तरीय कर्ण-बधिर असोसिएशनचा मोर्चा : साईन लँग्वेजमधून झाली भाषणेनागपूर : राज्यातील मूक व कर्णबधिर अपंगावर होणारे अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना इतरांप्रमाणे समान संधी मिळावी, यासाठी विधानसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व द्या, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातून आलेल्या मूक व कर्ण बधिरांनी आज विधानभवनावर धडक दिली. राज्यस्तरीय कर्ण-बधिर असोसिएशनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात कुठलीही नारेबाजी नव्हती. ध्वनिक्षेपकाचा आवाज नव्हता. तरीही हा मोर्चा प्रभावशाली ठरला. मोर्चात वरिष्ठ मंडळींची भाषणे सुरू होती. साईन लँग्वेजमधून सुरू असलेल्या या भाषणांना तेवढ्याच उत्साहात साईन लँग्वेजमधूनच प्रतिसादही मिळत होता. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. नाशिक, परभणी, अकोला, वर्धा, नाशिक, बीड, उस्मानाबाद, ठाणे, सोलापूर आणि लातूर येथून शेकडो मार्चेकरी आले होते. मोर्चेकरी आणि इतरांमधील संभाषण घडविण्यासाठी संदीप पाटील हा युवक दुवा होता. नेतृत्व मनोज पटवारी, प्रकाश फडके, अनिकेत सेलगावकर, रेणु आहुजा, कविता काळेमागण्या विधानसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व द्या.समान हक्क व समान न्याय द्या.साईन लँग्वेजला मूक व कर्णबधिरांची भाषा म्हणून मान्यता द्या.प्रलंबित सर्व मागण्यांची शासनाने या अधिवेशनात त्वरित पूर्तता करून दिलासा द्यावावाहतूक परवाना मान्य करा.
मूकबधिरांचा ‘आवाज’ पोहचेल काय?
By admin | Published: December 17, 2014 12:32 AM