लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरालगतच्या भागात नेटवर्क नसलेल्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावर जीपीआरएस प्रणाली लावण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे. यावर ९० लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु या प्रणालीमुळे टँकरचे लोकेशन प्राप्त होत असले तरी टँकर नेमका कुठे खाली केला. याची माहिती मिळत नाही. तसेच ट्रेकिंगनुसार टँकर किती किलोमीटर फिरला त्यानुसार पेमेंट दिले जात नाही. असे असतानाही या बिनकामाच्या प्रणालीवर अनाठायी खर्च कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरात सध्या २२४ टँकर सुरू आहेत. एका टँकरवर जीपीआरएस प्रणालीसाठी दररोज ११० रुपये खर्च होणार आहे. म्हणजेच वर्षाला एका टँकरवर ४० हजार रुपये खर्च होतील. हा खर्च टँकर धारकांकडून वसूल केला जाणार असला तरी निविदा सादर करताना हा खर्च गृहीत धरला जाणार असल्याने शेवटी याचा आर्थिक भुर्दंड मनपावरच पडणार आहे.माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात टँकर घोटाळ्याला आळा घालण्यासाठी टँकरवर जीपीआरएस प्रणाली लावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पाणी चोरीचे प्रकार थांबले नव्हते.प्रणालीमुळे टँकरचे लोकेशन मिळते परंतु टँकर मंगल कार्यालय वा हॉटेलमध्ये खाली झाल्यास त्याची कुठलीही माहिती मिळत नाही. त्यामुळे ही यंत्रणा कुचकामी ठरली होती.असे असतानाही पुन्हा ही प्रणाली बसविण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जलवाहिनीचे नेटवर्क असलेल्या शहरातील भागात नळाद्वारे पाणीपुरवठा झाल्यास वेळप्रसंगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तर शहरालगतच्या नेटवर्क नसलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे.अमृत योजनेंतर्गत नेटवर्क नसलेल्या भागात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम प्रगतिपथावर असून नासुप्रतर्फे बांधण्यात येत असलेल्या कळमना,नारा, वाजरा जलकुंभ कार्यान्वित होणार आहे.सदर काम पूर्ण होईपर्यंत या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याचा विचार करता जीपीआरएस प्रणाली बसविण्याचा प्रस्ताव जलप्रदाय विभागाने आणला आहे.टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या झोननिहाय वस्त्याधरमपेठ झोन- दाभा, वाडी,हजारीपहाड, चिंतामणी नगर.हनुमान झोन - चिंतेश्वर झोपडपट्टी, माँ भगवतीनगर, मेहरबाबा नगर ,वैष्णव माता नगर, श्रीकृष्ण नगर ,अभिजित नगर ,दौलत नगर, ताडेकर ले-आऊट, मंगलदीप नगर, मुद्रा नगर, महापुष्पनगरनेहरू नगर - जय जलाराम नगर, भवानी नगर सोसायटी, श्रीराम नगर झोपडपट्टी,शिवछत्रपती सोसायटी, नागपूर सोसायटी, नराने सोसायटी,सतरंजीपुरा - मौजा कळमना व वाजरा.लकडगंज- विजयनगर, कन्या नगर ,धरम नगर, भोले नगर, अंतुजी नगर, अब्बुमिया नगर, तुलसी नगर, दुर्गा नगर, भरतवाडा ले-आऊट.अशीनगर- वाजरा वस्ती, मुरलीधर सोसायटी ,समता नगर ,रंजना सोसायटी, रोहिणी सोसायटी, धम्मदीप नगर, पाहुणे ले-आऊट ,एकता नगर ,भीमवाडी, शिवनगरबिनकामाची यंत्रणाजीपीआरएस प्रणालीमुळे टँकर किती फिरला याची नोंद होत नाही. त्यानुसार पेमेंट दिले जात नाही. टँकर नेमका कुठेआहेत्याचे लोकेशन मिळत नाही. क्षेत्राचे लोकेशन मिळते.त्यामुळे टँकर लॉन अथवा हॉटेलमध्ये खाली झाल्यास नजर ठेवता येत नसल्याने ही यंत्रणा बिनकामाची आहे.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती मनपा.
टँकरवर जीपीआरएस प्रणालीचा उपयोग काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:29 PM
शहरालगतच्या भागात नेटवर्क नसलेल्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावर जीपीआरएस प्रणाली लावण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे.
ठळक मुद्देयाआधी बसविण्यात आलेली यंत्रणा कुठे गेली?