शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

‘महिला राज’चा उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:17 AM

जिल्हा परिषदेची मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून लोक जि.प.मध्ये आपल्या कामासाठी येतात. खेड्यापाड्यातून शहरात येणाºया महिलांना त्रास होऊ नये, ....

ठळक मुद्देजिल्हा परिषद : महिलांचे वर्चस्व असतानाही ही स्थिती, प्रतीक्षालय ठरले निरुपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेची मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून लोक जि.प.मध्ये आपल्या कामासाठी येतात. खेड्यापाड्यातून शहरात येणाºया महिलांना त्रास होऊ नये, कामकाज होर्ईपर्यंत त्यांना निवांत बसता यावे यासाठी जि.प.ने त्यांना हक्काचे कक्ष उपलब्ध करून दिले होते. परंतु हे प्रतिक्षालय गेल्या कित्येक वर्षापासून कुणी उघडलेले बघितलेच नाही. विशेष म्हणजे जि.प.मध्ये अध्यक्षापासून सीईओंपर्यंत सात महिलांचे वर्चस्व असतानाही, या महिलाराजमध्ये सुद्धा महिलांना प्रतिक्षालय उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.शुक्रवारी काही महिला जि.प.मध्ये कामकाजासाठी आल्या होत्या. बसायला इतरत्र जागा नसल्याने जुन्या इमारतीला लागून असलेल्या आबासाहेब खेडकर सभागृहाच्या पायºयांवरच बसल्या होत्या. या पायºयांच्याच अगदी समोर महिला प्रतिक्षालयाची पाटी लावलेली काही महिलांना दिसली. यातील एका महिलेने उत्सुकतेपोटी जाऊन बघितल्यावर प्रतिक्षालयाला कुलूपासह तारांनी बांधलेले होते. हे बघून कुरबूर न करता, ती महिला मुकाट्याने पायरीवर येऊन बसली. उत्सुकतेपोटी लोकमत प्रतिनिधीने कक्षाच्या बाजूलाच असलेल्या आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या शिपायाला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या नोकरीत हे कक्ष कधीच उघडले गेलेच नाही. याच परिसरात गेल्या १५ ते १६ वर्षापासून राहणाºया, जि.प.च्या कानाकोपºयाची माहिती असणाºया व्यक्तीलाही विचारले तर त्याने सांगितले की, या कक्षाचा गोदाम म्हणून उपयोग केला जातो. प्रतिक्षालयाच्या संदर्भात काही कर्मचाºयांनाही विचारणा केली, परंतु त्यांनाही कल्पना नव्हती. परंतु त्या कक्षापुढे महिला प्रतिक्षालयाची पाटी लिहिली असल्याने, बाहेरगावाहून येणाºया महिलांसाठी येथे बसण्याची व्यवस्था असेल, असेच यावरून दिसते.महिलांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष योग्य नाहीजि.प.मध्ये सीईओ, अतिरिक्त सीईओ, समाजकल्याण अधिकारी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या महिला आहेत. तर अध्यक्ष, महिला व बालकल्याण सभापती, कृषी सभापती या महिला आहेत. अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये महिलांचे वर्चस्व जास्त आहे. असे असतानाही महिलांच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असेल, तर योग्य नाही.विरोधी पक्षाचाही स्वतंत्र कक्ष नाही५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत २० च्यावर विरोधी पक्षाचे सदस्य आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही स्वतंत्र बसण्याला कक्ष नाही. विरोधी पक्षाचे सदस्य दरवेळी कुठल्यातरी सभापतीच्या कक्षात, कधी अध्यक्षाच्या कक्षात बसलेले दिसतात.