शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सदस्यांच्या राजीनाम्यामागे दडले काय ?

By admin | Published: November 29, 2014 2:49 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांसह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांसह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मंडळाच्या योजनांकडे प्रशासनाकडून जाणूनबूजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे कारण सदस्यांनी समोर केले आहे. परंतु यामागील नेमके कारण दुसरेच असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होत आहे. दरम्यान, अद्याप हे राजीनामे कुलगुरूंनी मंजूर केलेले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांच्यासह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मंडळाने सुरू केलेल्या नव्या योजनांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे.मंडळाने सुरू केलेल्या अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही. ३ वर्षांपूर्वी विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. परंतु त्यानंतर मात्र असा कार्यक्रम आयोजितच झाला नाही. राज्य पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंकरिता शिबिर आयोजित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.परंतु अशा प्रकारचे शिबिर एकदाही घेण्यात आले नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये हवा तसा समन्वय निर्माण होण्यास अडचणी येतात. शिवाय नागपूर विद्यापीठाला राज्य किंवा विभाग पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजकत्व मिळाल्यास स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूंसाठी कुलगुरूंतर्फे स्नेहभोज देण्यात येत होते. परंतु आता मात्र प्रशासनाने या योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नाराजीतून राजीनामे दिल्याची माहिती एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)